एलन मस्कचा WhatsApp ला झटका, आता फोन नंबर नसतानाही X वरून होणार ऑडिओ-व्हिडिओ कॉल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  एलन मस्कचा WhatsApp ला झटका, आता फोन नंबर नसतानाही X वरून होणार ऑडिओ-व्हिडिओ कॉल

एलन मस्कचा WhatsApp ला झटका, आता फोन नंबर नसतानाही X वरून होणार ऑडिओ-व्हिडिओ कॉल

Published Aug 31, 2023 05:28 PM IST

Video & Audio Calls to X: Xयूजर्सलवकरच याप्लेटफॉर्मच्या माध्यमातून ऑडियो-व्हिडिओ कॉल करू शकणार आहेत. यासाठी कोणत्याही फोन नंबरची आवश्यकता नसेल.

Video & Audio Calls to X
Video & Audio Calls to X

X Audio-Video Call : मायक्रो-ब्लॉगिंग प्लेटफॉर्म X चे मालक एलन मस्क यांनी आणखी एक मोठा धमाका केला आहे. X यूजर्स लवकरच या प्लेटफॉर्मच्या माध्यमातून ऑडियो-व्हिडिओ कॉल करू शकणार आहेत. यासाठी कोणत्याही फोन नंबरची आवश्यकता नसेल.Elon Musk यांनी गुरुवारी आपल्या X अकाउंटवरून या फिचरची माहिती दिली. ही सुविधा X के iOS,  Android, MAC आणि PC सर्व प्रकारच्या यूजर्सना मिळेल.

एलन मस्क यांनी X वर पोस्ट करत सांगितले की, एक्सवर व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल सर्विस लवकरच येणार आहे. ही सुविधा X चे iOS,  Android,  MAC आणि PC सर्व यूजर्संना मिळेल. फोन नंबर नसतानाही या माध्यमातून कॉल करता येणार आहे. मस्क यांनी म्हटले की, X एक इफेक्टिव ग्लोबल एड्रेस बुकआहे. हा एक यूनिक फॅक्टर आहे.

 

एक्समध्ये हे नवीन फीचर आल्यानंतर याचे प्रतिस्पर्धी METAचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांची झोप उडणार आहे. X ला टक्कर देण्यासाठी झुकरबर्गने नुकतेच एक नवीन सोशल मीडिया प्लेटफॉर्म Threads लाँच केले होते. दरम्यान X चे हे नवीन फीचर आल्यानंतर Instagram आणि WhatsApp ला मोठा झटका बसू शकतो.

उद्योगपती एलन मस्क यांनी मागच्या वर्षी ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यापासून अनेक बदल केले आहेत. एलन मस्क यांनी सर्वात आधी ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नाव बदलूनएक्स केले. आता एक्स अ‍ॅप सुपर अ‍ॅपमध्ये बदलण्याची योजना आखत आहेत. या दिशेने त्यांनी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता एक्समध्येही व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकप्रमाणे ऑडिओ-व्हिडिओ कॉल करता येणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर