मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Elon musk : 'युनो'मध्ये भारताला कायम सदस्यत्व नसल्यानं एलॉन मस्क भडकले! म्हणाले…

Elon musk : 'युनो'मध्ये भारताला कायम सदस्यत्व नसल्यानं एलॉन मस्क भडकले! म्हणाले…

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 23, 2024 12:22 PM IST

elon musk on india's permanent membership in un security council : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ति असलेले टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी संयुक्त राष्ट्र संघावर टीका केली आहे. सर्वाधिक लोकसंख्येचा देश असूनही भारताला सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व न मिळणे हे मूर्खपणाचे आहे, असे मस्क म्हणाला.

Elon Musk on india's permanent membership in un security council
Elon Musk on india's permanent membership in un security council (REUTERS)

elon musk on india's permanent membership in un security council : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या कायम सदस्यत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भारताला या परिषदेत कायमस्वरूपी सदस्यत्व न मिळाल्याने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्कने नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी देखील संयुक्त राष्ट्रांत बदलत्या काळानुसार नव्या सुधारणा करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले होते.

Kuno National Park Cheetah: कुनोतून आली गुड न्यूज! मादी चित्ता ज्वालाने दिला २ पिल्लांना जन्म

एलॉन मस्कने या संदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट लिहिली आहे. मस्क म्हणाला, 'संयुक्त राष्ट्र संघात सध्या सुधारणा करण्याची गरज आहे. मात्र, काही देशांना यात बदल होऊ द्यायचे नाहीत. जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असूनही भारताला सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व न मिळणे हे मूर्खपणाचे आहे. या सोबतच आफ्रिकेला देखील एकत्रितपणे कायमस्वरूपी जागा मिळणे गरजेचे असल्याचे मत मस्क याने व्यक्त केले आहे.

manoj jarange : जालना, बीड, नगर ओलांडून मनोज जरांगे पाटलांसह मराठा वादळ पुण्यात धडकले!

यापूर्वी संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी देखील 'आफ्रिकेला सुरक्षा परिषदेत एकही स्थायी जागा नाही हे आम्ही कसे स्वीकारू? असा प्रश्न उपस्थित केला होता. बदलत्या काळानुसार संयुक्त राष्ट्रसंघाने देखील बदल स्वीकारायला हवे. सध्याचे जग हे ८० वर्षांपूर्वीच्या जगासारखे नाही. त्यांनी पुढे लिहिले की, 'सप्टेंबरमध्ये होणारी शिखर परिषद जागतिक सुधारणा आणि विश्वासाची पुनर्बांधणी करण्यासाठी महत्वाची ठरेल.

याबाबत माईक आयझेनबर्ग यांनी लिहिले, 'आणि भारताचे काय? सध्या असलेली संयुक्त राष्ट्र संघटना बरखास्त करून जगातील नव्या बादलानुसार नव्या नेतृत्वासह नवी संघटना तयार करणे हे चांगले राहील.

सध्या संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत पाच स्थायी सदस्य आहेत. याशिवाय आणखी १० देश हे अस्थाई सदस्य आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेद्वारे त्यांची दोन वर्षांसाठी निवड केली जाते. पाच स्थायी सदस्य देशांमध्ये रशिया, ब्रिटन, चीन, फ्रान्स आणि अमेरिका यांचा समावेश आहे. भारत संयुक्त राष्ट्र संघाच्या कायम स्वरूपी सदस्यत्वासाठी प्रबळ दावेदार आहे. मात्र, सुरक्षा परिषदेतील कायम स्वरूपी स्थान न मिळाल्याने भारताने अनेकदा नाराजी देखील व्यक्त केली आहे.

WhatsApp channel