Elon Mask Nazi Salute: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून सोमवारी शपथ घेतली. व्हाईट हाऊसमध्ये पुन्हा प्रवेश करण्यापूर्वी त्यांचा भव्य शपथविधी सोहळा पार पडला. मात्र हा सोहळा विविध कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. या सोहळ्यात जगभरातील प्रमुख उद्योगपती उपस्थित होते. टेस्लाचे सीईओ आणि ट्रम्प यांचे निकटवर्तीय इलॉन मस्क देखील या सोहळ्यात उपस्थित होते. मात्र, या सोहळ्याला दरम्यान मस्क यांनी असं काही केलं आहे की, ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात त्यांनी नाझी. सॅल्यूट केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे, ज्यामुळे लोक नाराज झाले आहेत. त्यांच्या या सॅल्यूटवर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर काही तासांनंतर मस्क यांनी सोहळ्यास उपस्थीत असलेल्यांशी संवाद साधला. भाषणादरम्यान त्यांनी उपस्थीत पाहुण्यांना हात दाखवून सॅल्यूट केला. मात्र, त्यांनी केलेला हा सॅल्यूट वादाचा ठरला आहे. मस्क यांनी नाझी जर्मनी प्रमाणे सॅल्यूट केल्याचा आरोप होत आहे. यातून त्यांनी हिटलरचं उदात्तीकरण केल्याचं नेटकऱ्यांनी म्हटल आहे.
टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ मस्क यांच्याकडे ट्रम्प प्रशासनातील सर्वात महत्वाचा विभाग देण्यात आला आहे. सरकारी कार्यक्षमता विभागाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी मस्क यांच्यावर्वसोपविण्यात आली आहे. आपल्या शपथविधीच्या भाषणात मस्क म्हणाले की, ट्रम्प यांचा विजय अविश्वसनीय होता. वॉशिंग्टनमधील कॅपिटल वन एरिना मध्ये बोलताना मस्क म्हणाले, "मानवी संस्कृतीच्या मार्गातील हा टर्निंग पॉईंट आहे. असे म्हणत मस्क यांनी आपला उजवा हात छातीवर ठेऊन व हात वरच्या दिशेने करून सॅल्यूट केला.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मस्क यांच्या या कृतीवर टीका केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लोक या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया शेअर करत आहेत. मस्क यांनी नाझी सलामी दिल्याचे युजर्सचे म्हणणे आहे. त्याचबरोबर मस्क यांनी आपल्या भाषणाचा समारोप 'रोमन सलामी'ने केल्याचेही इस्रायली माध्यमांनी म्हटले आहे. रोमन सलामी ही नाझी जर्मनीशी निगडित फॅसिस्ट सलामी आहे. मात्र, काही लोक मस्क यांना पाठिंबाही देत आहेत.
संबंधित बातम्या