धार्मिक उत्सवात हत्ती चेकाळला; सोंडेने भक्ताची तंगडी पकडून हवेत भिरकावल्याचा व्हिडिओ व्हायरल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  धार्मिक उत्सवात हत्ती चेकाळला; सोंडेने भक्ताची तंगडी पकडून हवेत भिरकावल्याचा व्हिडिओ व्हायरल

धार्मिक उत्सवात हत्ती चेकाळला; सोंडेने भक्ताची तंगडी पकडून हवेत भिरकावल्याचा व्हिडिओ व्हायरल

Jan 09, 2025 10:40 AM IST

केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील एका मशिदीत काल, मंगळवारी रात्री उशिरा एका वार्षिक उत्सवादरम्यान हत्ती चेकाळल्याने उत्सवात सामील किमान १७ जण जखमी झाले आहेत.

केरळात हत्ती चेकाळल्याने २० जण जखमी
केरळात हत्ती चेकाळल्याने २० जण जखमी

केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील एका मशिदीत काल, मंगळवारी रात्री उशिरा एका वार्षिक उत्सवादरम्यान हत्ती चेकाळल्याने उत्सवात सामील किमान २३ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एका व्यक्तिची प्रकृती गंभीर आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या दुर्घटनेदरम्यान चेकाळलेला हत्ती एका व्यक्तीच्या पायात सोंड अडकवून त्याला वर हवेत उंच भिरकावत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

केरळातील मलप्पुरम जिल्ह्यात थिरूर येथे दर वर्षी ‘पुथियांगडी’ उत्सव आयोजित करण्यात येत असतो. या उत्सवासाठी परिसरातील शेकडो लोक जमा होतात. उत्सवादरम्यान पाच हत्तींवरून मिरवणूक काढण्यात येते. काल झालेल्या कार्यक्रमाच्या दृष्यांमध्ये सोनेरी पट्ट्यांनी सजलेले पाच हत्ती दिसत आहेत. उत्सव सुरू असताना अचानक एक हत्ती चेकाळला आणि समोर जमलेल्या जमावावर त्याने एकच हल्ला केला. त्यापैकी समोर उभा असलेल्या एका व्यक्तिच्या पायाला हत्तीने सोंडेत पकडले, त्याला वर उचलले आणि हवेत भिरकावत असल्याचे दृष्य अनेकांना आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद केले आहे. लोक सुरक्षितत स्थळी धावण्यासाठी धडपडत असल्याचे दिसून येते. हत्तीच्या हल्ल्यामुळे गर्दीत एकच दहशत पसरवली होती. या दहशतीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने बहुतांश लोक जखमी झाले आहेत. दरम्यान, या चेकाळलेल्या हत्तीला नियंत्रित करण्यासाठी माहूत धडपडत असल्याचे दिसून येते. दरम्यान, दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर हत्तीवर नियंत्रण मिळवण्यात माहूतला यश आले होते. ‘पक्कथु श्रीकुट्टन’ असे या हत्तीचे नाव आहे.

हत्तीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर कोटक्कल येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही माणसे बेड्या घालून हत्तीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना दिसले. हत्तीला आटोक्यात आणण्यासाठी सुमारे दोन तास लागले. आणखी नुकसान होऊ नये म्हणून हत्ती तेव्हा मस्तकाजवळ होता. कारण गर्दीतील लोकांनी त्यांचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला होता.

दरम्यान, हत्ती चेकाळल्याचे वृत्त समजताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. हत्ती का चेकाळला याचा तपास वन विभागाचे अधिकारी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. एखाद्या सार्वजनिक मिरवणुकीत पाळीव जंगली प्राण्यांना सामील करून घेत असताना वन विभागाने दिलेल्या नियमावलीचे पालन करावे लागते. या उत्सवात त्या नियमावलीचे योग्य ते पालन केले गेले की नाही, याचाही तपास केला जात आहे.

 

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर