मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  JNU मध्ये मोदींवरील बीबीसीची डॉक्युमेंटरी पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर दगडफेक, वीज व इंटरनेटही खंडित
बीबीसीची डॉक्युमेंटरी पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर दगडफेक
बीबीसीची डॉक्युमेंटरी पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर दगडफेक

JNU मध्ये मोदींवरील बीबीसीची डॉक्युमेंटरी पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर दगडफेक, वीज व इंटरनेटही खंडित

24 January 2023, 23:32 ISTShrikant Ashok Londhe

bbc documentary on pm modi : बीबीसीने पंतप्रधान मोदी यांच्यावर बनवलेली डॉक्युमेंटरी पाहणाऱ्या जेएनयूतील विद्यार्थ्यांवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. तसेच प्रशासनाने वीज व इंटरनेट सेवाही खंडित केली आहे.

JNU BBC Documentary Screening : बीबीसीच्या मोदींवरील बनवण्यात आलेल्या डॉक्यूमेंट्रीवरून निर्माण झालेला वाद चिघळत चालला आहे. आता डाक्यूमेंट्रीवरून दिल्लीतील जेएनयू कॅम्पसमध्येही राडा झाला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) विद्यार्थ्यांनी मंगळवारी (२४ जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बनवण्यात आलेल्या बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीच्या स्क्रीनिंगची घोषणा केली होती.  दरम्यान या स्क्रीनिंगच्या आधी विद्यार्थी संघाच्या कार्यालयातील वीज पुरवठा खंडीत केला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांवर दगडफेक केल्याचा दावाही केला जात आहे. ABVP आणि डाव्या पक्षाशी संबंधित संघटनांमध्ये दगडफेक झाली तसेच इंटरनेटही बंद करण्यात आले.

ट्रेंडिंग न्यूज

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघाची अध्यक्ष आयशी घोष हिने दावा केला आहे की, जेएनयू प्रशासनाने वीज पुरवठा खंडीत केला. बीबीसीच्या ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ डॉक्यूमेंट्री सीरीज गुजरात दंगलीवर (Gujarat Riots) आधारित आहे. जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते.

डॉक्यूमेंट्रीची स्क्रीनिंग रात्री ९ वाजता सुरू होणार होती आणि प्रशासनाची परवानगी नसतानाही विद्यार्थ्यांनी ही चित्रफीत दाखवण्याचा निर्णय घेतला. जेएनयू प्रशासनाने स्क्रीनिंगची परवानगी दिली नव्हती त्याचबरोबर म्हटले होते की, डॉक्यूमेंट्रीचे स्क्रीनिंग झाल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. दरम्यान विद्यार्थ्यांनी म्हटले की, स्क्रीनिंगमुळे विद्यापीठातील कोणत्याही नियमाचे उल्लंघन होणार नाही.

आयशी घोषने म्हटले की, आम्ही स्क्रीनिंग करणार कारण बीबीसीची डॉक्यूमेंट्री बॅन नाही. ही चित्रफीत वास्तव दाखवते. त्यांना भीती आहे की, सत्य बाहेर येईल. तुम्ही वीज हिरावू शकता मात्र आमचे डोळे व इच्छा आहे. तुम्ही स्क्रीनिंग रोखू शकत नाहीत. आम्ही हजारो स्क्रीनवर हे पाहू पोलीस व भाजपमध्ये दम असेल तर रोखून दाखवावे.

विभाग