मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Electricity Crisis: १३ राज्यांना झटका; बिलाचे तब्बल ५ हजार कोटी थकीत असल्याने वीज खरेदीवर बंदी

Electricity Crisis: १३ राज्यांना झटका; बिलाचे तब्बल ५ हजार कोटी थकीत असल्याने वीज खरेदीवर बंदी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 19, 2022 07:13 PM IST

Electricity Payment: वीज टंचाईने एकीकडे देश त्रस्त असताना आता नवे संकट आले आहे. देशातील १३ राज्यांनी वीज खरेदीचे ५ हजार कोटी थकवल्याने आता त्यांच्यावर वीज खरेदी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

वीज टंचाईने एकीकडे देश त्रस्त असताना आता नवे संकट आले आहे. देशातील १३ राज्याचे वीज खरेदीचे ५ हजार कोटी थकवल्याने आता त्यांच्यावर वीज खरेदी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
वीज टंचाईने एकीकडे देश त्रस्त असताना आता नवे संकट आले आहे. देशातील १३ राज्याचे वीज खरेदीचे ५ हजार कोटी थकवल्याने आता त्यांच्यावर वीज खरेदी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी असलेल्या पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने (POSOCO)ने देशातील १३ राज्यांना मोठा झटका दिला आहे. वीज खरेदीचे तब्बल ५ हजार कोटी रुपये थकीत असल्याने POSOCOने वीज पुरवठा करणाऱ्या इंडिया एनर्जी एक्सचेंज, पॉवर एक्सचेंज ऑफ इंडिया आणि हिंदुस्थान पॉवर एक्सचेंज या कंपन्यांना देशातील १३ राज्यांना वीजेचा पुरवठा करु नका असे निर्देश दिले आहेत. या १३ राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. त्यामुळे राज्यात विजेचे संकट आणखी गहिरे होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र, तामिळनाडू, जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाना, बिहार, छत्तीसगड आणि झारखंड अशी वीज खरेदीची रक्कम थकवणाऱ्या राज्यांची नावे आहेत. केंद्रीय वीज मंत्रालयाच्या अंतर्गत पोसोको कंपनी येत असून या कंपनीने दिलेल्या आदेशामुळे आता या १३ राज्यांना या पुढे वीज खरेदी करता येणार नाही.

वीज खरेदीच्या थकीत रक्कमे संदर्भात पोसोकेने वीज पुरवणाऱ्या तीन कंपन्यांना पत्र लिहून वरील राज्यातील २७ वितरण कंपन्यांची विक्री ही १९ ऑगस्ट पासून पुढील आदेश येईपर्यंत बंद करा असे निर्देश या पत्रात दिले आहे. या पत्रात या १३ राज्यांचा उल्लेख असून त्यांच्या कडे ५ हजार कोटीची रक्कम थकीत आहे. त्यामुळे या राज्यांचा वीज पुरवठा हा थकीत रक्कम वसूल होई पर्यन्त बंद ठेवा असे आदेश या पत्रात देण्यात आले आहेत.

IPL_Entry_Point

विभाग