मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  EC to Government : व्हॉट्सअ‍ॅपवर 'विकसित भारत'चे मेसेज पाठवणे थांबवा; निवडणूक आयोगाचे सरकारला आदेश

EC to Government : व्हॉट्सअ‍ॅपवर 'विकसित भारत'चे मेसेज पाठवणे थांबवा; निवडणूक आयोगाचे सरकारला आदेश

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 21, 2024 06:05 PM IST

EC to Goverment Over Viksit Bharat WhatsApp messages: निवडणूक आयागाने सरकारला व्हॉट्सअ‍ॅपवरील 'विकसित भारत' मेसेज पाठवणे तात्काळ थांबविण्याचे आदेश दिले.

निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला व्हॉट्सॲपवर विकसित भारत मेसेज पाठवणे तात्काळ थांबवण्याचे निर्देश दिले.
निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला व्हॉट्सॲपवर विकसित भारत मेसेज पाठवणे तात्काळ थांबवण्याचे निर्देश दिले.

Election Commission to govt: व्हॉट्सअ‍ॅपवरील 'विकसित भारत' मेसेज पाठवणे तात्काळ थांबविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला दिले आहेत. तसेच आयटी मंत्रालयाकडून या संदर्भात अहवाल मागितला आहे. सार्वत्रिक निवडणूक आणि आदर्श आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा होऊनही नागरिकांच्या फोनवर सरकारच्या उपक्रमांची माहिती देणारे मेसेज येत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्रासोबत जारी करण्यात आलेले मेसेज १६ मार्च रोजी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पाठविण्यात आले. परंतु, काही ठिकाणी नेटवर्कच्या तांत्रिक अडचणींमुळे तो काहींना उशिरा मिळत आहे, अशी माहिती मंत्रालयाने आयोगाला दिली होती. लोकसभा निवडणूक २०२४ ची घोषणा आणि आचारसंहिता लागू असतानाही सरकारच्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकणारे असे मेसेज अजूनही सर्वसामान्यांच्या फोनवर पाठवले जात असल्याच्या अनेक तक्रारी आयोगाकडे आल्या होत्या. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने या मेसेजवर आक्षेप घेत निवडणूक आयोगाला कारवाई करण्याची विनंती केली.

'विकसित भारत'च्या व्हॉट्सअ‍ॅप मेसेजसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्रासह नागरिकांकडून अभिप्राय आणि सूचना मागविल्या जात आहेत. सार्वत्रिक निवडणुकांच्या घोषणेच्या पूर्वसंध्येला जारी करण्यात आलेल्या मेसेजमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे की, "आम्ही विकसित भारतच्या निर्मितीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करत असताना मला तुमच्या कल्पना, सूचना आणि पाठिंब्याची गरज आहे.१४० कोटी भारतीयांचा विश्वास आणि पाठिंबा मला प्रेरणा देतो. सरकारी योजना आणि कार्यक्रमांमुळे लोकांच्या जीवनात परिवर्तन झाल्याचे पाहायला मिळत असून गेल्या दहा वर्षांतील हे आमच्या सरकारचे सर्वात मोठे यश असल्याचे त्यांनी म्हटले आहे."

WhatsApp channel

विभाग