ECI press conference : जम्मू-काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा, कधी मतदान आणि कधी येणार निकाल?-election commission press conference live announcement of assembly elections of maharashtra haryana jammu kashmir ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ECI press conference : जम्मू-काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा, कधी मतदान आणि कधी येणार निकाल?

ECI press conference : जम्मू-काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा, कधी मतदान आणि कधी येणार निकाल?

Aug 16, 2024 04:26 PM IST

ECI on Assembly Election Live Updates : केंद्रीय निवडणूक आयोगानं आज जम्मू-काश्मीर व हरयाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा केली.

election commission press conference Live: निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू
election commission press conference Live: निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू

ECI on Assembly Election Live Updates : केंद्रीय निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषद घेऊन जम्मू-काश्मीर व हरयाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. त्यानुसार जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यांत तर, हरयाणात एका टप्प्यात मतदान होणार आहे. दोन्ही निवडणुकांचे निकाल ४ ऑक्टोबरला एकाच दिवशी जाहीर होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली.

निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

 

Assembly Election Schedule, ३.५० वा. - निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद संपली

Assembly Election Schedule, ३.३९ वा. -  महाराष्ट्रात गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्री, दिवाळी हे उत्सव आहेत हे लक्षात घेतलं आहे. त्याशिवाय, जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा जास्त लागणार आहे. एका वेळी दोन राज्यांच्या निवडणुकीत व्यवस्थित हाताळता येतील असं आम्हाला वाटतं. त्यामुळं सध्या फक्त दोन राज्यांच्या निवडणुका आम्ही घोषित करत आहोत - राजीव कुमार

Assembly Election Schedule, ३.३५ वा. - महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा नाही!

Haryana Assembly Election Schedule, ३.३० वा. - हरयाणा विधानसभेची निवडणूक प्रक्रिया ५ सप्टेंबरपासून सुरू होणार. १ ऑक्टोबरला मतदान होईल आणि निकाल ४ ऑक्टोबरला जाहीर होतील. निवडणुकीचे निकाल ४ ऑक्टोबरला जाहीर होतील - राजीव कुमार

Jammu Kashmir Assembly Election Schedule, ३.३० वा. - जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यांत निवडणुका होतील. २० ऑगस्टला जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीची अधिसूचना निघेल. १८ सप्टेंबरला पहिल्या टप्प्याचं मतदान होईल. दुसऱ्या टप्प्याचं मतदान २५ सप्टेंबरला होईल आणि तिसऱ्या टप्प्याचं मतदान १ ऑक्टोबरला होईल. - राजीव कुमार

Assembly Election Schedule, ३.२५ वा. - निवडणुकीचा काळ कमीत कमी असावा असा आमचा प्रयत्न आहे - राजीव कुमार

Assembly Election Schedule, ३.२५ वा. - सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांना पुरेशी आणि समान सुरक्षा व्यवस्था मिळावी अशी जम्मू-काश्मीरमधील पक्षांची मागणी आहे. ती पूर्ण केली जाईल - राजीव कुमार

Haryana Assembly Election Schedule, ३.२० वा. - हरयाणाची मतदार यादी २७ ऑगस्टला प्रसिद्ध होईल.

Haryana Assembly Election schedule, ३.१९ वा.  - हरयाणात ९० विधानसभा मतदारसंघ आहेत. राज्यात २ कोटी १ लाख मतदार आहेत. त्यात १.०६ पुरुष मतदार व महिला मतदार ९५ लाख आहेत.

Assembly Election Schedule, ३.१७ वा. - लोकसभा निवडणुकीतील पायावर विधानसभेची इमारत उभी राहील, राजीव कुमार यांनी व्यक्त केला विश्वास

Assembly Election Schedule, ३.१५ वा. - १९ ऑगस्टला अमरनाथ यात्रा संपल्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. त्यावेळी पुढील घोषणा केली जाईल - राजीव कुमार

Assembly Election Schedule, ३.१५ वा. - जम्मू-काश्मीरमध्ये ९० विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील ७४ सर्वसाधारण मतदारसंघ आहेत. यात ९ एसटी आणि ७ एससी मतदारसंघाचा समावेश आहे. राज्यात ८७.०९ लाख मतदार आहेत. ४४.४६ लाख पुरुष व ४२.६३ लाख महिला मतदार आहेत. - राजीव कुमार

Assembly Election Schedule, ३.१० वा. - जम्मू-काश्मीर आणि हरयाणातील निवडणूक तयारीचा आम्ही अलीकडंच आढावा घेतला. तिथं राजकीय पक्षांमध्ये आणि नागरिकांमध्ये निवडणुकीविषयी प्रचंड उत्साह आहे. लोकसभा निवडणुकीत काश्मीरमध्ये नागरिकांनी रांगा लावून मतदान केलं. बुलेटला बॅलटनं उत्तर दिलं - राजीव कुमार

Rajiv Kumar on Jammu Kashmir,  ३.०५ वा. - लोकसभा निवडणूक देशात निष्पक्षपातीपणे आणि शांततेत पार पडली. जगासमोर आम्ही एक उदाहरण ठेवलं - राजीव कुमार

ECI Press Conference Live, ३.०० वा.  - केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार पत्रकार परिषदेला संबोधित करत आहेत.

विभाग