मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  वृद्धेने धुतले भाजपच्या महिला आमदाराचे पाय, स्पष्टीकरण देत म्हणाल्या, 'मला…'

वृद्धेने धुतले भाजपच्या महिला आमदाराचे पाय, स्पष्टीकरण देत म्हणाल्या, 'मला…'

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
May 21, 2022 01:50 PM IST

भाजपच्या महिला आमदार त्यांच्या मतदारसंघात पूरग्रस्त भागाची पाहणी करायला गेल्यानंतर वृद्ध महिलेने त्यांचे पाय धुतल्याचा व्हिडिओ समोर येत आहे.

भाजप आमदार मिमी मजूमदार
भाजप आमदार मिमी मजूमदार

आसाममध्ये पावसाने थैमान घातलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. तिथे पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी गेलेल्या भाजप आमदाराने बचावपथकातील कर्मचाऱ्याच्या पाठीवर बसून बोटीपर्यंत गेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता त्रिपुरात एक असाच धक्कादायक प्रकार बघायला मिळाला आहे. त्रिपुरात सत्ताधारी असलेल्या भाजप आमदाराचा व्हिडिओ आता समोर आला आहे. यामध्ये महिला आमदाराचे पाय एका महिला धुवत असतानाचा हा व्हिडिओ आहे. मिमी मजूमदार असं महिला आमदाराचं नाव असून त्या त्यांच्या मतदारसंघातील पूरबाधित सूर्यपाडा इथं गेल्या होत्या. आता त्यांच्यावर सोशल मीडियावरून जोरदार टीका केली जात आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिला आमदार मिमी मजूमदार यांनी स्पष्टीकऱण दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, "संबंधित महिलेनं प्रेमाने माझे पाय धुतले होते." सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये भारती देवनाथ नावाची महिला मिमी मजूमदार यांचे पाय साबण लावून पाण्याने धुताना दिसतात. तसंच महिला त्यांचे पायसुद्धा पुसते. हा व्हिडिओ नेमका कधीचा हे समोर आलेलं नाही. मात्र महिला आमदारांकडून त्या भागातली पाहणी करण्यात आल्यानंतर पाय धुण्यात आल्याचं समजते.

बधारघाटमधून मिमी मजूमदार २०१९ मध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजयी झाल्या होत्या. निवडणुकीच्या आधी काही दिवस त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मिमी मजूमदार यांनी पाय धुण्याच्या प्रकारावर स्पष्टीकरण देताना म्हटलं की, वयोवृद्ध महिलेनं एका आमदाराबद्दल प्रेम आणि आपुलकीने ते केलं. महिला मला मुलगी मानते आणि याकडे नकारात्मक दृष्टीकोनातून पाहू नये. यातून दिसतं की एखादा आमदार चांगलं काम केल्यानंतर कसा आदर मिळवतो. मला वाटतं की आजच्या जगात कोणालाही असं कुणाचे तरी पाय धुवायला लावता येऊ शकत नाही.

IPL_Entry_Point

विभाग