रिपोर्ट लिहिण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलेल्या वृद्धाला आला हृदयविकाराचा झटका! पोलिसांनी सीपीआर देऊन वाचवले प्राण
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  रिपोर्ट लिहिण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलेल्या वृद्धाला आला हृदयविकाराचा झटका! पोलिसांनी सीपीआर देऊन वाचवले प्राण

रिपोर्ट लिहिण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलेल्या वृद्धाला आला हृदयविकाराचा झटका! पोलिसांनी सीपीआर देऊन वाचवले प्राण

Published Sep 24, 2024 03:37 PM IST

Viral Video : पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या एका वृद्ध व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला. यावेळी ठाण्यात उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने वृद्ध व्यक्तीला सीपीआर देऊन त्याचे प्राण वाचवले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

रिपोर्ट लिहिण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलेल्या वृद्धाला आला हृदयविकाराचा झटका! पोलिसांनी सीपीआर देऊन वाचवले प्राण
रिपोर्ट लिहिण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलेल्या वृद्धाला आला हृदयविकाराचा झटका! पोलिसांनी सीपीआर देऊन वाचवले प्राण

Viral Video : आग्रा येथील जीआरपी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या एका वृद्धाला हार्ट अटॅक येऊन पोलिस ठण्यातच कोसळल्याने ठाण्यात उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने या वृद्ध व्यक्तीला सीपीआरदेत त्याचे प्राण वाचवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. तसेच नेटकऱ्यांनी पोलिसांच्या या तत्परतेचे कौतुक केले आहे.

एक वृद्ध व्यक्ति हे आग्रा येथील एका पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते.  यावेळी अचानक या वृद्धाला हृदयविकाराचा झटका आला आणि कोणाला काही समजण्याआधीच वृद्ध व्यक्ति खाली जमिनीवर कोसळला. यावेळी ठाण्यात असलेल्या पोलिसांनीत तातडीने कारवाई करत त्याला सीपीआर उपचार दिले. सुमारे एक मिनिट एक मिनिट या वृद्धाला सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन) देण्यात आला. यामुळे वृद्धाचा जीव वाचला. ही घटना १६ सप्टेंबर रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आणि व्हॉट्सॲपवर शेअर केला आहे. रात्री १० च्या सुमारास दोन वृद्ध आग्राच्या जीआरपी पोलिस ठाण्यात आले होते. यावेळी कॉन्स्टेबल राकेश कुमार आणि कॉन्स्टेबल रवेंद्र चौधरी हे रात्रीच्या ड्युटीवर होते. त्याचा मोबाईल कुठेतरी पडल्याचे वृद्धाने सांगितले.

यावेळी वृद्धाने आपली तक्रार एका कागदावर लिहून हवालदाराला दिली. त्याला रिसिव्हिंग देण्यासाठी कॉन्स्टेबल रवेंद्र चौधरी रिपोर्ट दाखल करत होते. यादरम्यान हा वृद्ध व्यक्ति अचानक खाली पडला. वृद्ध व्यक्ति जमिनीवर पडल्याचे पाहून हवालदार रवेंद्र आणि राकेश यांनी त्याला तातडीने तपासले. वृध्दाला हृदयविकाराचा झटका आल्याचे समजताच त्यांनी वेळ न घालवता ताबडतोब सीपीआर देण्यास सुरुवात केली.

सुमारे एक मिनिट या वृद्धाला सीपीआर देण्यात आला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, वृद्ध व्यक्तीसोबत असलेली दुसरी व्यक्तीही यावेळी मदतीसाठी प्रयत्न करत असतांना दिसत आहे. त्याने पोलिस कर्मचाऱ्याला पाण्याची बाटली दिली आणि पोलिसाने त्याला शुद्धीवर आणण्यासाठी त्या वृद्धाच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले. १ मिनिट ३८ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये काही प्रयत्न केल्यावर वृद्ध व्यक्ति पुन्हा शुद्धीवर आला. यानंतर पोलिस ठाण्याचे इन्स्पेक्टर देखील तेथे आले. त्यानंतर वृद्ध व्यक्तिला तातडीने दवाखान्यात नेण्यात आले.

सीपीआरचे महत्त्व

सीपीआर एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराच्या झटक्यापासून वाचण्यास मदत करू शकते. हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे ओळखल्यानंतर, रुग्णाला ताबडतोब सीपीआर दिल्यास त्या व्यक्तीचा प्राण वाचू शकतो. छातीत दाबणे आणि तोंडाने ऑक्सिजन देणे या प्रक्रियेला सीपीआर म्हणणात या स्थितीत मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचल्याने रुग्णाचा मृत्यू टाळता येतो.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर