mia khalifa karvachauth Viral news : सोशल मिडियावर प्रसिद्ध होण्यासाठी कोण काय करेल याचा काही अंदाज नाही. उत्तर भारतात साजरा करण्यात येणारा करवा चौथ हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिलांनी उपवास ठेवत चंद्राची पूजा देखील केली. मात्र, एका वृद्ध व्यक्तीनं थेट पोर्न स्टार मिया खलिफाच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचा उपवास केला. एवढेच नाही तर या वृद्ध व्यक्तीनं मिया खलिफाच्या फोटोला पाणी पाजत त्याचा उपवास सोडला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया या व्हिडिओवर दिल्या आहेत.
करवा चौथचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. या सेलिब्रेशननंतर सोशल मीडियावर कपल्सचे फोटो, व्हिडीओ आणि रीलचा महापूर आला आहे. दरम्यान, एक अनोखा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्याला पाहून सोशल मीडिया यूजर्सने त्या व्यक्तीची खिल्ली उडवताना दिसत आहेत. एका वृद्धाने त्याची आवडती पॉर्न स्टार मिया खलिफा हिच्यासाठी करवा चौथ उपवास केला. पारंपारिक पोशाख परिधान केलेल्या एका वृद्ध व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत मिया खलिफाच्या फोटोसमोर करवा चौथचा विधी करत असतांना हा वृद्ध व्यक्ति दिसत आहे. तसेच चाळणीतून पाहिल्यानंतर तो तिच्या फोटोला पाणी पाजतो व आरतीही करतो.
करवा चौथचा सण विवाहित महिलांसाठी खूप खास असतो. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. संध्याकाळी चंद्र पाहिल्यानंतर ते उपवास सोडतात. आजकाल अविवाहित मुलीही आपल्या भविष्यातील जोडीदारासाठी किंवा प्रियकरासाठी उपवास करतात, असा ही ट्रेंड गेल्या काही दिवसांनपासून सुरू आहे.
व्हायरल झालेला हा व्हिडिओ मजेशीर कंटेंटसाठी ओळखल्या जाणाऱ्या गुरुजी या युजरने एक्सवर शेअर केला आहे. या व्हायरल व्हिडिओवर एका युजरने लिहिले की, मिया खलिफा दीर्घायुष्य लाभो. एकाने याला भीतीदायक म्हटले आहे. त्याने लिहिले की, "हे भीतीदायक आहे: वृद्ध व्यक्ती मिया खलिफासाठी करवा चौथची पूजा करते. जगात काय चालले आहे ?
व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स या वृद्ध व्यक्तीबाबत परस्परविरोधी मतं मांडताना दिसत आहेत. अनेक लोक या व्यक्तीला मूर्ख म्हणत आहे. तर काही लोक त्याच्या भक्ती आणि प्रेमाला सलाम करत आहेत. यासोबतच वृद्धांना ट्रोल करणाऱ्यांचीही कमी नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, मिया खलिफाशी संबंधित असे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. खलिफा स्वतः सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे हॉट फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
संबंधित बातम्या