मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  एकनाथ शिंदेंचं बंड हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न, आम्ही नंतर बोलू - शरद पवार
Sharad Pawar
Sharad Pawar (HT_PRINT)
21 June 2022, 14:34 ISTGanesh Pandurang Kadam
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
21 June 2022, 14:34 IST
  • Sharad Pawar on Eknath Shinde: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बंडाच्या पवित्र्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Sharad Pawar on Eknath Shinde: 'एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तो त्यांच्या पद्धतीनं हाताळत आहेत. त्यांच्या पक्षात चर्चा सुरू आहे. त्यांचा निर्णय झाल्यावर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. यातून काहीतरी मार्ग निघेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

शरद पवार यांनी आज राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी साहजिकच त्यांना शिवसेनेतील बंडखोरीबद्दल विचारण्यात आलं. शरद पवार यांनी त्या प्रश्नांना शांतपणे उत्तर दिलं. 'राज्यात जे काही सुरू आहे, ते आमच्यासाठी नवीन नाही. मागील अडीच वर्षांत तीन वेळा अशी घटना घडली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेच्या सुरुवातीला असाच प्रकार घडला होता. मात्र, त्यातून काही निष्पन्न झालं नाही. त्यानंतर सरकार स्थापन होऊन मागचे अडीच वर्षे ते सुरळीतपणे चाललं आहे. आताच्या पेचातूनही काहीतरी मार्ग निघेल, असं शरद पवार म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपली चर्चा झाली आहे का, असं विचारलं असता शरद पवार यांनी नकारार्थी उत्तर दिलं. 'एकनाथ शिंदे यांचं बंड हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर शिवसेनेची चर्चा सुरू आहे. त्यांच्या पक्षाची बैठक सुरू आहे. त्यांची भूमिका काय आहे हे कळेपर्यंत आम्हाला आमचा निर्णय घेता येणार नाही, असं शरद पवार म्हणाले.

विधान परिषदेच्या निवडणुकीत मतं फुटल्याबद्दल विचारलं असता, यात काही नवीन नसल्याचं ते म्हणाले. 'विधान परिषद व राज्यसभेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग होत असतं, असं त्यांनी सांगितलं.

काहीतरी सेन्सिबल प्रश्न विचारा!

शिवसेनेत फूट पडून सरकार पडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस भाजपमध्ये जाणार का असा प्रश्न एका पत्रकारानं पवारांना विचारलं. त्यावर ते भडकले. काहीतरी सेन्सिबल प्रश्न विचारा, असं ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस विरोधातही बसू शकते, असं ते म्हणाले.