मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Eknath Shinde : शिंदे सरकार राहणार की जाणार?; ‘या’ तारखेला येणार सुप्रीम कोर्टाचा निकाल

Eknath Shinde : शिंदे सरकार राहणार की जाणार?; ‘या’ तारखेला येणार सुप्रीम कोर्टाचा निकाल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 26, 2023 02:13 PM IST

eknath shinde disqualification verdict : राज्याती सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात केव्हाच संपली आहे. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टातील पाच न्यायाधीशांचं खंडपीठ निकाल देणार आहे.

maharashtra political crisis supreme court result date
maharashtra political crisis supreme court result date (HT)

maharashtra political crisis supreme court result date : गेल्या नऊ महिन्यांपासून राज्यात सत्तांतर झालेलं असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेवर सुप्रीम कोर्टातून निकाल आलेला नाही. काही दिवसांपूर्वी शिंदे आणि ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात युक्तिवाद पूर्ण करण्यात आला होता. सुनावणी संपल्यानंतर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांचं खंडपीठ राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर ऐतिहासिक निकाल देणार आहे. त्याआधी राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरले किंवा नाही ठरले, त्यादृष्टीने राजकीय समीकरणांची बांधणी केली जात आहे. परंतु आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अपात्रतेवरील निकाल कधी येणार?, याबाबतची मोठी अपडेट समोर आल आहे.

सुप्रीम कोर्टातील निकाल कधी येणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील १६ आमदारांची अपात्रता, राज्यपालांची भूमिका, उद्धव ठाकरेंचा राजीनामा आणि शिवसेना कुणाची?, या प्रश्नांवर सुप्रीम कोर्ट लवकरच निकाल देण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणातील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठातील न्या. एमआर शहा हे येत्या १५ एप्रिलला निवृत्त होणार आहेत. त्यामुळं त्यांच्या कार्यकाळात म्हणजेच १५ एप्रिलच्या आधीच राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर निकाल येण्याची शक्यता आहे. पाच न्यायाधीशांनी घेतलेल्या निर्णयावर त्यांची सही झाल्यानंतर सुप्रीम कोर्टात निकालाचं वाचन करण्यात येणार आहे. त्यामुळं आता सुप्रीम कोर्टातही हालचालींना वेग आल्याचं बोललं जात आहे.

Pune water Cut : पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट; धरणात उरला जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा

१५ एप्रिलपर्यंत निकाल नाही आला तर?

सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश एमआर शहा हे १५ एप्रिलला निवृत्त होणार आहे. ते राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीत असल्यामुळं त्यांच्या कार्यकाळातच निकाल येणं अपेक्षित आहे. परंतु १५ एप्रिलपर्यंतही निकाल आला नाही तर नव्याने रुजू होणाऱ्या न्यायाधीशांच्या समोर संपूर्ण सुनावणी पुन्हा नव्याने पार पडेल. त्यात पूर्वीच्या चार न्यायाधीशांचा समावेश असेल. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड हे देखील त्या खंडपीठात असू शकतात. परंतु या प्रकरणाची पुन्हा सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळं आता १५ एप्रिल पूर्वीच राज्यातील सत्तासंघर्षाच्या सर्व याचिकांवर सुप्रीम कोर्टातून निकाल येण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel