Eid al-fitr 2024 : रमजानच्या (Ramzan) महिन्यातील २८ वे रोजे संपताच सगळीकडे ईदच्या (Eid Al Fitr 2024) तयारी सुरू होतात. जर २९ व्या दिवशी चंद्र दिसला तर ३० व्या दिवशी ईद साजरी केली जाते. दरम्यान मशिदी व दर्ग्यांवर तसेच घरात साफसफाई व सजावटीचे काम सुरू करण्यात आले आहे. चौका-चौकातील दुकाने सजली आहेत. कुर्ता पायजामा, चप्पल, कॉस्मेटिक दुकानांवर गर्दी दिसत आहे. महिन्यापासून सुनसान पडलेल्या मार्केट व दुकानांमध्ये ईदची चमक दिसून येत आहे.
रमजानचा महिना २९ किंवा ३० दिवसांचा असतो मंगळवारी २९ वा दिसत पूर्ण झाला. आज चंद्राचे दर्शन झाले नसल्याने उद्या रमजान साजरी होणार नाही. आज (मंगळवार) चंद्राचे दर्शन झाले नसल्याने ईद-उल-फितर गुरुवारी (India to celebrate Eid-ul-Fitr on Thursday) साजरी केली जाणार आहे. मात्र रमजानचा पवित्र महिना बुधवारी संपत आहे.
तत्पूर्वी, हैदराबादमधील रुएत-ए-हिलाल समितीने (Central Ruet-e-Hilal Committee) शव्वाल चंद्रकोर (Shawwal crescent moon) चंद्राच्या दर्शनाबाबत मासिक बैठक बोलावली होती. चंद्र दिसल्याची घोषणा करणे आणि शरीयत पुराव्याच्या आधारे भारतात ईद-उल-फितरची तारीख घोषित करण्याची जबाबदारी या समितीवर असते.
सोमवारी ८ एप्रिल रोजी सौदीत शव्वाल क्रिसेंट मून दिसला नाही. त्यामुळे ईद अल फितर बुधवारी, १० एप्रिल २०२४ रोजी साजरी केली जाणार आहे. दरम्यान मोरक्को येथील मुस्लिम प्रकरणातील मंत्रालयाने घोषणा केली आहे की, ईद अल फितरसाठी क्रिसेंट मून मंगळवार दिसून येईल. केरळ भारतातील एकमेव राज्य आहे, ज्याची ईद-उल-फितरची तारीख सौदीच्या चंद्र दर्शनाच्या आधारे निश्चित केली जाते.
रमजानचा महिना संपत आल्याने ईदची तयारी जोरात सुरू झाल्या आहेत. कडक उन्हातही लोक खरेदीसाठी बाजारात जात आहेत. खरेदीसाठी लोकांनी गर्दी केल्याने बाजारातील उलाढाल वाढली आहे. ईदची तयारी घरांपासून बाजारांपर्यंत दिसत आहे.
संबंधित बातम्या