Arvind Kejriwal : समन्स वर समन्स! दारू घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांना ईडीने पाठवली चौथ्यांदा नोटीस; अडचणीत होणार वाढ
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Arvind Kejriwal : समन्स वर समन्स! दारू घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांना ईडीने पाठवली चौथ्यांदा नोटीस; अडचणीत होणार वाढ

Arvind Kejriwal : समन्स वर समन्स! दारू घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांना ईडीने पाठवली चौथ्यांदा नोटीस; अडचणीत होणार वाढ

Jan 13, 2024 12:18 PM IST

ED Summon To Delhi CM Arvind Kejriwal : कथित दारू घोटाळ्या प्रकरणी ईडीने ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांना पुन्हा समन्स वाजवले आहे. त्यांना १८ जानेवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहे.

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal (PTI)

ED Summon To Delhi CM Arvind Kejriwal : कथित दारू घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) सुप्रिमो अरविंद केजरीवाल यांना चौथ्यांदा समन्स बजावले आहे. ईडीने केजरिवाल यांना १८ जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. केजरीवाल यांनी या पूर्वी ईडीने पाठवलेले तिन्ही समन्स बेकायदेशी ठरवले होते.

जे घरंदाज आहेत, त्यांनीच घराणेशाहीवर बोलावे; उद्धव ठाकरेंचा मोदींना बोचरा टोला

अरविंद केजरिवाल यांना यापूर्वी २ नोव्हेंबर, २१ डिसेंबर आणि ३ जानेवारी असे एकूण तीन समन्स पाठवले होते. मात्र, या तिन्ही समन्सला अरविंद केजरीवाल ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले नाहीत, आता चौथ्या समन्सनंतर केजरीवाल ईडीसमोर हजर होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ईडीने ३ जानेवारीला अरविंद केजरीवालांना समन्स बजावले होते. त्यावेळी आम आदमी पार्टीनं म्हटलं होतं की, अरविंद केजरीवाल ईडीला चौकशीत सहकार्य करण्यासाठी तयार आहेत. मात्र, ईडीनं बजावलेलं समन्स हे राजकारणाशी संबंधित आहे. ते बेकायदेशीर असल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. केजरीवाल यांना अटक करण्याचा ईडीचा डाव आहे, असाही आरोप करण्यात आला होता. 'आप'ने म्हटले आहे की, निवडणुकीपूर्वी नोटीस का पाठवली? नोटीस म्हणजे केजरीवाल यांना प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न आहे. 'आप'ने समन्सच्या वेळेवरही प्रश्न उपस्थित केले होते.

मोठी बातमी! मुंबईहून गुवाहाटीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचं ढाक्यात इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!

आम आदमी पार्टीने म्हटले आहे की, लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना, भारतीय जनता पक्ष (भाजप) अरविंद केजरीवाल यांना प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी आणि त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी ईडीचा वापर करत आहे. पक्षाने ईडीकडून स्पष्टीकरण मागितले असूनही केजरीवाल यांना कोणत्या उद्देशाने बोलावले जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री हे आरोपी किंवा साक्षीदार नाहीत, असे आपने म्हटले होते.

मनीष सिसोदिया हे गेल्या एक वर्षांपासून तुरुंगात आहेत. ईडीने अद्याप त्यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे गोळा केलेले नाहीत. त्यांच्यानंतर आता त्यांना अरविंद केजरीवाल यांना अटक करायची आहे. विरोधकांना टार्गेट करण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर केला जत आहे, असा आरोप आपने केला आहे.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर