मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या निकटवर्तीयांवर ईडीचे छापे; १० ठिकाणी झाडाझडती

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या निकटवर्तीयांवर ईडीचे छापे; १० ठिकाणी झाडाझडती

Feb 06, 2024 12:36 PM IST

ED action against Arvind Kejriwal : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आम आदमी पार्टीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले आहे. मुख्यमंत्री अरविन्द केजरिवाल यांच्या पीएसह १० ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत.

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal (PTI)

ED action on arvind kejriwal : कथित दारू घोटाळ्यानंतर आम आदमी पक्षाच्या आता पाणी घोटाळ्या संबंधित प्रकरणात अडचणी वाढू शकतात. ईडीने अरविन्द केजरिवाल यांच्या निकटवर्तीयांवर फास आवळला आहे. दिल्लीतील १० ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यात केजरीवाल यांचे खाजगी सचिव आणि आम आदमी पक्षाशी संबंधित काही नेत्यांच्या घरावर हे छापे टाकण्यात आले आहेत. दिल्ली जल बोर्डाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासाचा म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pimpri Chinchwad : बॉयफ्रेण्डनं केला अपमान! हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन तरुणीनं संपवलं आयुष्य

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खाजगी सचिव विभव कुमार यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने छापा टाकला आहे. 'आप'चे राज्यसभा खासदार एनडी गुप्ता यांच्या घरीही ईडीचे पथक पोहोचले आहेत. याशिवाय दिल्ली जल बोर्डाच्या एका माजी सदस्याच्या घरावर छापा टाकल्याचीही माहिती आहे. ईडीने हे छापे अशा वेळी टाकले आहेत, जेव्हा आम आदमी पक्षाचे नेते आणि अरविंद केजरीवाल सरकारचे मंत्री आतिशी यांनी आज सकाळी १० वाजता ईडीवर अनेक आरोप केले. पत्रकार परिषदे घेत आतिशी यांनी दारू घोटाळ्यातील आरोपींवर त्यांना धमकावणे आणि खोटी विधाने करून घेण्याचा आरोप केला. या बाबत माहिती पुढे आल्यावर ईडीने छापेमारी सुरू केल्याचा त्यांनी आरोप केला.

Maharashtra weather update : राज्यात 'या' भागात पावसाची शक्यता; थंडी लवकरच होणार गायब! असे असेल आजचे हवामान

या प्रकरणाशी संबंधित लोकांनी सांगितले की, हे प्रकरण दिल्ली जल बोर्डातील निविदा प्रक्रियेतील कथित अनियमिततेशी संबंधित आहे. ३१ जानेवारी रोजी एजन्सीने दिल्ली जल बोर्डाचे माजी मुख्य अभियंता जगदीश कुमार अरोरा आणि व्यापारी अनिल कुमार अग्रवाल यांना पीएमएलए प्रकरणात अटक केली होती. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला होता. जगदीश कुमार अरोरा (तत्कालीन मुख्य अभियंता) यांनी एनकेजी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला दिल्ली जल बोर्डाची काही कंत्राटे ३८,०२,३३,०८० रुपयांची दिल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. कंपनीकडे तांत्रिक पात्रता नसतानाही ही कंत्राटे देण्यात आल्याचे म्हटले आहे.

ईडीने गेल्या आठवड्यात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'तपासात समोर आले आहे की एनकेजी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने बनावट कागदपत्रांच्या आधारे कंत्राट मिळवले. कंपनीकडे तांत्रिक क्षमता नसल्याचे जगदीश कुमार यांना माहीत होते. एनकेजी इन्फ्रास्ट्रक्चरने कामाचे कंत्राट इंटिग्रल स्क्रू लिमिटेडला दिले, ज्याची मालकी अनिल अग्रवाल यांच्याकडे आहे. अनिल कुमार अग्रवाल याने जगदीश कुमार यांना रोख रक्कम आणि बँक खाते हस्तांतरणाद्वारे ३ कोटी रुपयांची लाच दिली. जगदीश कुमार अरोरा यांच्या जवळच्या लोकांची आणि नातेवाईकांची बँक खाती लाचेची रक्कम घेण्यासाठी वापरली जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

WhatsApp channel