मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  kolkata raid: कोलकात्यात व्यापाऱ्याच्या घरावर ईडीचा छापा; पैशांचा ढीग मोजण्यासाठी मागवावे लागले मशीन

kolkata raid: कोलकात्यात व्यापाऱ्याच्या घरावर ईडीचा छापा; पैशांचा ढीग मोजण्यासाठी मागवावे लागले मशीन

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 10, 2022 05:20 PM IST

Kolkata ED Raid: ईडीने कोलकत्ता येथे एका व्यापाराच्या घरावर धाड टाकली. ईडीच्या पथकाला घरात पैशांचा डोंगर सापडला आहे. हे पैसे मोजण्यासाठी यंत्र पथकाने आणले असून रोख रक्कम मोजण्याचे काम हे सुरू आहे.

ED Raid
ED Raid

Kolkata ED Raid: : ईडीने कोलकत्ता येथे एका व्यापाराच्या घरावर धाड टाकली. ईडीच्या पथकाला घरात पैशांचा डोंगर सापडला आहे. हे पैसे मोजण्यासाठी यंत्र पथकाने आणले असून रोख रक्कम मोजण्याचे काम हे सुरू आहे.

ईडीने मोबाइल अप्लिकेशन घोटाळ्याचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणी कोलकत्ता येथील एका व्यापऱ्याच्या घरावर ईडीने छापे टाकले असून पैशांचा डोंगर ईडीच्या पथकाच्या हाती लागला आहे. तब्बल ६ ठिकाणी ईडीमार्फत छापेमारी सुरू आहे. या ठिकाणी कोट्यवधी रुपयांची रोख पथकाला मिळाली आहे. पैसे मोजण्यासाठी मशीन आणले असून पैसे मोजण्याचे काम सुरू आहे.

या संदर्भात एनआयएने दिलेल्या वृत्तानुसार ईडीच्या अधिकाऱ्यांचे एक पथक बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत शनिवारी कोलकाता येथील गार्डन रीच परिसरातील व्यापारी नासिर खान यांच्या घरावर धाड टाकली. त्यांच्या घरातून तब्बल सात कोटी रुपये रोकड आणि संपत्तीची कागदपत्रे जप्त करण्यात अलायी आहेत. काही ठिकाणी रोकड मोजण्याचे काम सुरू असून नेमकी रक्कम किती आहे हे मोजण्यासाठी पैसे मोजण्याचे यंत्र आणण्यात आले आहे.

ही धाड टाकतांना मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ही कारवाई काही खास व्यापऱ्यांवर करण्यात येत आहे, ज्यांच्यावर पैशाच्या अफरातफरीमध्ये सहभागी असल्याचा संशय आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी फेडरल बैंकच्या अधिकाऱ्यांसोबत आमिर खान या व्यावसायिकावर मोबाइल गेमिंगच्या माध्यमातून लोकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग एक्ट (पीएमएलए) अंतर्गत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ईडी च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाइल गेमिंग अँपच्या माध्यमातून सुरुवातीला कमिशनच्या नावाखाली बक्षीस देण्याच्या बहाण्याने लोकांना आकर्षित करण्यात आले. आणि त्यानंतर या अँपवर लोक आकर्षित झाले, तेव्हा जास्त परतव्याच्या लोभापोटी अनेकांनी यात मोठी गुंतवणूक केली. यंतर या नागरिकांना फसवण्यात आले.

या प्रकरणी ईडीने म्हटले की, लोकांकडून रक्कम वसूल केल्यावर अँप अपग्रेडेशनच्या नावावर हे अँप बंद करण्यात आले. तोपर्यन्त मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गुंतवणूक केली होती. यानतर नागरिकांच्या माहितीसह रक्कम लुटण्यात आली.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग