
ईडीच्या (सक्तवसुली संचालनालय) पथकाने उद्योगपती अनिल अंबानी यांच्या घरावर छापा टाकला आहे. गुरुवारी केंद्रीय तपास यंत्रणेची पथके त्यांच्याशी संबंधित कंपन्यांवर छापे टाकण्यासाठी दाखल झाली होती. ईडीने पीएमएलए अंतर्गत कारवाई केली आहे. तपासाचा एक भाग म्हणून एजन्सीने या गटाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवरही छापे टाकले आहेत.
चौकशीचा भाग म्हणून ईडीने रिलायन्स अनिल अंबानी समूहावर कारवाई केल्याचे वृत्त आहे. पीएमएलए अंतर्गत सुमारे ३५ ठिकाणे आणि ५० कंपन्यांची चौकशी केली जात आहे. तसेच २५ हून अधिक जण ईडीच्या रडारवर आहेत. मात्र, या काळात त्यांच्या घराचा तपासात समावेश करण्यात आलेला नाही. दिल्ली आणि मुंबईतील ईडीची पथके त्यांच्या समूहातील कंपन्यांच्या आवारात पोहोचली आहेत.
विशेष म्हणजे ईडीची ही कारवाई अशा वेळी होत आहे जेव्हा काही दिवसांपूर्वी एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि त्याचे प्रवर्तक अनिल अंबानी यांना 'फ्रॉड' म्हटले होते.
का टाकण्यात आला छापा?
वृत्त आहे की, तीन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज घोटाळ्याप्रकरणी ईडीने अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांवर आणि 'येस बँके'वर गुरूवारी छापे टाकले. राष्ट्रीय गृहनिर्माण बँक, सेबी, एनएफआरए आणि बँक ऑफ बडोदा सह अनेक वित्तीय संस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआयने दोन एफआयआर आणि माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ईडीचा दावा आहे की, सार्वजनिक निधीच्या गैरव्यवहाराचे पुरावे आहेत. तसेच या प्रक्रियेदरम्यान बँका, भागधारक, गुंतवणूकदारांसह अनेकांची दिशाभूल करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
संबंधित बातम्या
