Fake Ayushman Card : बनावट आयुष्मान कार्ड प्रकरणी EDची मोठी कारवाई! ‘या’ राज्यात १९ ठिकाणी धाडी, मोठी नावे आली समोर
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Fake Ayushman Card : बनावट आयुष्मान कार्ड प्रकरणी EDची मोठी कारवाई! ‘या’ राज्यात १९ ठिकाणी धाडी, मोठी नावे आली समोर

Fake Ayushman Card : बनावट आयुष्मान कार्ड प्रकरणी EDची मोठी कारवाई! ‘या’ राज्यात १९ ठिकाणी धाडी, मोठी नावे आली समोर

Published Jul 31, 2024 04:10 PM IST

Fake Ayushman Card : आयुष्मान योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. बनावट कार्ड तयार करून वैद्यकीय बिले सरकारकडून वसूल केली जात असल्या प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे.

बनावट आयुष्मान कार्ड प्रकरणी EDची  मोठी कारवाई! ‘या’ राज्यात १९ ठिकाणी धाडी, मोठी नावे आली समोर
बनावट आयुष्मान कार्ड प्रकरणी EDची मोठी कारवाई! ‘या’ राज्यात १९ ठिकाणी धाडी, मोठी नावे आली समोर

Fake Ayushman Card : अंमलबजावणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेचे बनावट ओळखपत्र बनविण्याच्या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. ईडीने देशात १९ ठिकाणांवर छापेमारी केली आहे. या प्रकरणी ईडीने दिल्ली, चंदीगढ, पंजाब, हिमाचल प्रदेशमधील कांगडा, ऊना, शिमला, मंडी, कुल्लू येथे विविध ठिकाणी छापे टाकत कारवाई केली आहे.

बनावट आयुष्मान कार्ड बनवून रूग्णांवर उपचार करण्याच्या नावाखाली सरकारकडून पैसे वसूल केल्याप्रकरणी ईडीने तपास मोहीम सुरू केली आहे. या प्रकरणी ईडीने दिल्ली, चंदीगड, पंजाब आणि हिमाचल प्रदेशातील १९ ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत बनावट आयुष्मान कार्ड तयार करून सरकारचे पैसे लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. बनावट कार्डच्या आधारे वैद्यकीय बिलेही तयार करण्यात आली असून त्या द्वारे ही फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात अनेक बड्या लोकांची नावेही समोर आली आहेत.

हिमाचल प्रदेशातील कांगडा, उना, शिमला, मंडी आणि कुल्लू येथे अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली आहे. बांके बिहारी रुग्णालय, फोर्टिस रुग्णालय या रुग्णालयांचा यात हात असल्याचं तपासात पुढं आलं आहे. याशिवाय हिमाचलच्या कांगडा जिल्ह्यातील नागरोटा मतदारसंघातून आमदार आरएस बाली यांचे नावही देखील या फसवणुक प्रकरणी पुढे आले आहे. हिमाचल प्रदेश पर्यटन महामंडळाचे उपाध्यक्षही आहेत. याशिवाय कांगडा येथील श्री बालाजी हॉस्पिटलचे डॉ. राजेश शर्मा यांचेही नाव या फसवणुकीत समोर आले आहे. ते हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांचे जवळचे मानले जातात.

अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये दुसऱ्याच्या आयुष्मान कार्डवर दुसऱ्याच व्यक्तिने उपचार घेतले आहे. इतकेच नव्हे तर कोणालाही दाखल न करता किंवा उपचार न करता बिले तयार करून पैसे वसूल केल्याच्या अनेक घटना देखील उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे ईडीने हे प्रकरण हटी घेतले असून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात अनेक बड्या रुग्णालयांची आणि सेलिब्रिटींचीही नावे समोर आली आहेत, जे धक्कादायक आहे. आयुष्मान योजनेंतर्गत गरीब कुटुंबातील लोकांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जातात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर