Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्यामागे पुन्हा ईडीचा ससेमिरा लागणार, 'त्या' प्रकरणाची सखोल चौकशी होणार-ed likely to question rahul gandhi in national herald case report ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्यामागे पुन्हा ईडीचा ससेमिरा लागणार, 'त्या' प्रकरणाची सखोल चौकशी होणार

Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्यामागे पुन्हा ईडीचा ससेमिरा लागणार, 'त्या' प्रकरणाची सखोल चौकशी होणार

Aug 12, 2024 09:23 AM IST

ED on Rahul Gandhi : ईडी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची पुन्हा चौकशी करण्याच्या तयारीत आहेत. ईडीने यापूर्वीच राहुल गांधी यांची ७५१ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

राहुल गांधींना 'या' प्रकरणात ईडी लवकरच बजावणार समन्स, चौकशीची होण्याची शक्यता
राहुल गांधींना 'या' प्रकरणात ईडी लवकरच बजावणार समन्स, चौकशीची होण्याची शक्यता (PTI)

ED on Rahul Gandhi : खासदार राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालय लवकरच राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नसले तरी नॅशनल हेराल्ड प्रकरणातील मनी लाँड्रिंग प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणा राहुल गांधी यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. ईडीने जून २०२२ मध्ये काँग्रेस राहुल गांधी यांची या प्रकरणी चौकशी केली आहे,

हिंदुस्तान टाईम्सने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, ईडीला अनियमिततेच्या तपासाबाबत निष्कर्षापर्यंत पोहोचायचे आहे. त्यामुळे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची पुन्हा चौकशी केली जाऊ शकते. विशेष बाब म्हणजे ईडीने यापूर्वीच ७५१ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. अहवालानुसार, ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडचा तपास पूर्ण करण्याची तयारी ईडी करत आहे. यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड (वायआयएल) ही गांधी कुटुंबाच्या मालकीची आहे. या मार्फत नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र चालवणाऱ्या असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) या कंपनीतील शेअरहोल्डिंग पॅटर्नबाबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची चौकशी ईडी मार्फत सुरू आहे. या प्रकरणी सोनिया गांधी यांची देखील चौकशी करण्यात आली आहे. एजेएलची चौकशी पूर्ण करण्याचा विचारात ईडीचे अधिकारी असून खटल्याची सुनावणी लवकर व्हावी म्हणून अभियोजन तक्रार दाखल करण्याच्या तयारीत ईडी आहे. यामुळे आज राहुल गांधी यांच्या सह आज संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.

राहुल गांधी यांनी व्यक्त केली होती कारवाईची भीती

अर्थसंकल्पीय अधिवेषणादरम्यान, राहुल गांधी यानही सरकारवर जोरदार टीका केली होती. यानंतर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली होती, या बाबत स्वत: राहुल गांधी यांनी २ ऑगस्ट रोजी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा सरकारच्या आदेशाची वाट पाहत असल्याचे त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं होत. माझ संसदेतील भाषण काही जणांना आवडले नाही असे देखील राहुल गांधी म्हणाले होते.

काय आहे प्रकरण ?

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केलेले नॅशनल हेराल्ड एजेएलने प्रकाशित केले होते. २०१० मध्ये आर्थिक अडचणीत सापडलेल्या एजेएलला नव्याने स्थापन झालेल्या वायआयएल कंपनीने ताब्यात घेतले आणि सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा हे दोघेही या संस्थेचे संचालक होते.

एजेएलची स्थापना १९३० च्या दशकात नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र छापण्यासाठी झाली होती. या कंपनीत ५,००० स्वातंत्र्यसैनिक भागधारक होते, असा आरोप आहे. एजेएल आता गांधींच्या कौटुंबिक मालकीत आहे. एजेएलने २००८ मध्ये जाहीर केले की ते यापुढे वर्तमानपत्रे छापणार नाहीत आणि रिअल इस्टेटमध्ये प्रवेश करतील, अशी घोषणा केली होती. २०१० मध्ये वायआयएल ही नवी कंपनी पाच लाख रुपयांसह स्थापन करण्यात आली आणि राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासह अन्य काँग्रेस नेते या कंपनीचे संचालक झाले. धर्मादाय कार्य करण्याचे कंपनीने वचन दिले असतांना यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप ईडीने केला आहे.

विभाग