मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ED Raid k Kavitha : ईडीची मोठी कारवाई; केसीआर यांची मुलगी के कविता यांना घेतलं ताब्यात, काय आहे प्रकरण?

ED Raid k Kavitha : ईडीची मोठी कारवाई; केसीआर यांची मुलगी के कविता यांना घेतलं ताब्यात, काय आहे प्रकरण?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 15, 2024 07:16 PM IST

ED Detained BRS Leader K Kavitha : ईडीने दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी बीआरएस पक्षाच्या नेत्या के कविता यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांना दिल्लीला नेण्यात येणार आहे.

के. कविता यांना ईडीने घेतले ताब्यात
के. कविता यांना ईडीने घेतले ताब्यात

दिल्‍ली दारू घोटाळ्याप्रकरणी (Delhi Liquor Policy case) सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate) मोठी कारवाई करत भारत राष्‍ट्र समितीचे नेते केसीआर यांची मुलगी के कविता (K Kavitha) यांना हैदराबाद येथून ताब्यात घेतलं आहे. ईडी आता के. कविता यांना चौकशीसाठी तेलंगाणातून दिल्लीला नेत आहे. के कविता यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी ईडीने आज छापेमारी केली होती. त्यानंतर काही तासातच त्यांना ताब्यात घेतलं. कविता यांनी ईडीचे काही समन्स येऊनही चौकशीसाठी उपस्थित राहिल्या नव्हत्या. त्यानंतर ईडीने त्यांच्या घरावर छापा मारला होता. 

के कविता तेलंगाना विधान परिषद सदस्या असून बीआरएस पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची मुलगी आहे. ईडीने दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात त्यांची यापूर्वीही चौकशी केली आहे. गेल्या तीन महिन्यात त्यांना ईडीने दोन समन्स पाठवूनही त्या चौकशीसाठी गैरहजर राहिल्या होत्या. 

कविता यांना अशावेळी ईडीने ताब्यात घेतले आहे, जेव्हा काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. त्याचबरोबर तेलंगानामध्ये काँग्रेस सरकारने १०० दिवस पूर्ण केले आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज सायंकाळी हैदराबादमधील उपनगर मल्काजगिरी येथे रोड शो करणार आहेत. 

आरोपी अमित अरोडा याने घेतले होते कविता यांचे नाव -  

दिल्लीतील दारू धोरण घोटाळा संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील एक आरोपी अमित अरोडा याने चौकशी दरम्यान कविता यांचे नाव घेतले होते. तसेच ईडीचा आरोप आहे की, 'साउथ ग्रुप' नावाच्या लिकर लॉबीने एक अन्य आरोपी विजय नायरच्या माध्यमातून AAP नेत्यांना लाचेच्या रुपाच १०० कोटी रुपये दिले होते. 

ईडीने दावा केला होता की, कविता दारू व्यावसायिकांची लॉबी ‘साउथ ग्रुप' शी संबधित होत्या. त्यांनी २०२१-२२ मध्ये दिल्ली दारू धोरणात महत्वाची भूमिका निभावली होती. हे धोरण ता रद्द केले आहे.

IPL_Entry_Point

विभाग