
नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी व सोनिया गांधी यांना ईडीने मोठी धक्का दिला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (Associated Journals Ltd) आणि यंग इंडियाची ७५१ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. AJL च्या मालमत्तेची एकूण किंमत ही ६६१.६९ कोटी रुपये आहे. ईडीने दिल्ली, लखनौ आणि मुंबईतील मालमत्ता जप्त केल्या आहेत. तर यंग इंडियनच्या (Young Indian) जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत ही ९०.२१ कोटी रुपये आहे. या प्रकरणामध्ये ईडीने राहुल व सोनिया यांची अनेकदा चौकशी केली आहे.
नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित प्रकरणी ईडी कथित मनी लाँड्रिंगचा तपास करत आहे. याप्रकरणी ईडी आधीपासूनच याप्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी केली आहे. यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडद्वारे वृत्तपत्र चालवणाऱ्या असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडच्या अधिग्रहणात फसवणूक, कट रचणे आणि विश्वासार्हतेचं उल्लंघन केल्याच्या आरोपांचा समावेश आहे.
यंग इंडियन कंपनीचे ३८ टक्के शेअर्स सोनिया गांधींकडे आहेत आणि तितकेच शेअर्स राहुल गांधींकडे आहेत. यंग इंडियन कंपनी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडने टेकओव्हर केली होती. मात्र याच हस्तांतरणाच्या व्यवहारात मनी लाँड्रिंग झाल्याचा आरोप आहे.
नॅशनल हेराल्ड मनी लाँडरिंग प्रकरणात गेल्या काही महिन्यांत ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि पवन बन्सल यांसारख्या वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची चौकशी केली आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, असोसिएट जर्नल्स लिमिटेडच्या मुंबई, दिल्ली आणि लखनऊतील संपत्तीची किंमत ६६७.९ कोटी आहे. तसंच यंग इंडियनच्या मालमत्तेची किंमत ९०.२१ कोटी आहे. याबाबत २६ जून २०१४ रोजी तक्रार दाखल करून आली होती. त्या आधारे मनी-लाँडरिंगचा तपास सुरू आहे.
यादरम्यान न्यायालयाने मान्य केलं की,यंग इंडियनसह सात आरोपींनी प्रथमदर्शनी आयपीसीच्या कलम ४०६ अन्वये विश्वासाचा भंग, IPC कलम ४०३ अंतर्गत मालमत्तेचा गैरवापर आणि कलम १२०B अंतर्गत गुन्हेगारी कट रचणे, IPC कलम ४२० अंतर्गत फसवणूक करणे आणि अप्रामाणिकपणे प्रवृत्त करणे असे गुन्हे केले आहेत.
संबंधित बातम्या
