Ecuador Gunmen कुख्यात गुंडाच्या समर्थकांचा टीव्ही चॅनेलमध्ये हैदोस; अँकरला उचलून नेले
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ecuador Gunmen कुख्यात गुंडाच्या समर्थकांचा टीव्ही चॅनेलमध्ये हैदोस; अँकरला उचलून नेले

Ecuador Gunmen कुख्यात गुंडाच्या समर्थकांचा टीव्ही चॅनेलमध्ये हैदोस; अँकरला उचलून नेले

Jan 10, 2024 10:36 AM IST

Ecuador Gunmen : लॅटीन अमेरिकन देश इक्वाडोरमध्ये मंगळवारी धक्कादायक घटना घडली. काही बंदूकधारी व्यक्ति हे एका टीव्ही चॅनलच्या कार्यालयात घुसले. त्यांनी थेट प्रक्षेपण सुरु असताना टीव्ही स्टुडिओवर हल्ला करत काही लोकांना बंदी बनवले.

Ecuador Gunmen
Ecuador Gunmen

Ecuador Gunmen : इक्वाडोरमध्ये कुख्यात गुंड तुरुंगातून पळून गेल्यावर शहरात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती, या टोळीने अनेक पोलिस अधिकार्‍यांच्या अपहरणासह शहरात अनेक ठिकाणी हल्ले केले. दरम्यान, एका टीव्ही कार्यालयात थेट प्रक्षेपण सुरू असतांना हातात बंदुका आणि बॉम्ब घेऊन काही गुंड घुसले. लाईव्ह प्रोग्राम सुरू असतांना त्यांनी हातात बंदुका आणि बॉम्ब दाखवत दहशत माजवली. तसेच टीव्ही कार्यालयातील अनेकांना बंदी बनवले. ही घटना मंगळवारी (दि ९) घडली. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर दहशतवाद विरोधी कायद्या अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.

इक्वाडोमध्ये बुधवारी ड्रग माफिया जोस अडोल्फो मॅकियास उर्फ फिटो इक्वेडोरमधील तुरुंगातून मंगळवारी फरार झाला. यानंतर शहरात तणावाची परिस्थिती होती. मंगळवारी एकीकडे टीव्ही स्टुडिओवर हल्ला झाला, तर दुसरीकडे ७ पोलिसांचे अपहरण करण्यात आले. या घटनेमुळे शहरात आणीबाणी घोषित करण्यात आली.

इक्वाडोरमध्ये पोर्ट सिटी गुआयाकिलमध्ये टीसी टेलिव्हिजन नेटवर्कच्या स्टुडिओमध्ये लाईव कार्यक्रम सुरू असतांना अचानक १३ दहशतवादी हातात बंदुका व बॉम्ब घेऊन घुसले. हा सर्व प्रकार जनतेने थेट पहिला. आरोपींनी स्टुडिओत असलेल्यांना धमकावले. सर्व १३ दहशतवादी तोंडांवर काळा कपडा बांधून हातात बंदूक आणि स्फोटके घेत दहशत माजवली. तब्बल १५ मिनिटे हा प्रकार सुरू होता. यानंतर त्यांनी टीव्ही अँकरला उचलून नेले. या प्रकारानंतर राष्ट्राध्यक्ष डॅनियल नोबोआ यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. राष्ट्रपतींनी तुरुंगांवर लष्कराने पहारा ठेवण्याचे आदेश देखील त्यांनी दिले. देशात असलेल्या २० अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांना दहशतवादी गट म्हणून घोषित करण्यात आले आहे.

टीसी टेलिव्हिजनच्या बातम्या प्रमुख, अलिना मॅनरिक या संदर्भात माहिती देतांना म्हणाल्या, तब्बल १३ ते १५ जणांचा दहशतवाद्यांचा एक गट अचानक स्टुडिओत घुसला. त्यांच्या हातात बंदुका आणि स्फोटके होती. एका दहशतवाद्याने माझ्या डोक्यावर बंदूक लावली आणि त्याला जमिनीवर बसण्यास सांगितलं. यावेळी लाईव सुरू असल्याने ही घटना संपूर्ण शहरात थेट प्रक्षेपित होत होती. तब्बल १५ मिनिटे हा थरार सुरू होता. यानंतर टीव्हीचा सिग्नल बंद करण्यात आला.

यानंतर इक्वाडोर पोलिसांनी दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम चालवली. या सर्वांना अटक करण्यात आली आहे. इक्वाडोरच्या राष्ट्रीय पोलिस प्रमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही सर्व मास्क घातलेल्या दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बंदुका आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी घाबरूंन जाऊ नये असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

पोलिस कमांडर सेझर झापाटा यांनी टेलिमाझोनास या टीव्ही चॅनेलला सांगितले की, अधिकाऱ्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या बंदुका आणि स्फोटके जप्त केली. १३ जणांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लॉस चोनेरोस टोळीचा म्होरक्या अॅडॉल्फो मॅकियास उर्फ “फिटो” रविवारी तुरुंगातून फरार झाला. यानंतर हे हल्ले झाले. फिटोला रविवारी दुसऱ्या जेल मध्ये पाठवले जाणार होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर