Viral Video: गोळ्यांच्या पाकिटाच्या मदतीनं झटक्यात सुईमध्ये ओवला धागा, पाहा महिलेचा देशी जुगाड!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: गोळ्यांच्या पाकिटाच्या मदतीनं झटक्यात सुईमध्ये ओवला धागा, पाहा महिलेचा देशी जुगाड!

Viral Video: गोळ्यांच्या पाकिटाच्या मदतीनं झटक्यात सुईमध्ये ओवला धागा, पाहा महिलेचा देशी जुगाड!

Nov 25, 2024 05:47 PM IST

Easiest Way to Thread Needle: सुईमध्ये धागा ओवणे कठीण वाटणाऱ्या लोकांसाठी हा व्हिडिओ अत्यंत फायदेशीर ठरू शकतो.

गोळ्यांच्या पाकिटाच्या मदतीनं झटक्यात सुईमध्ये ओवला धागा
गोळ्यांच्या पाकिटाच्या मदतीनं झटक्यात सुईमध्ये ओवला धागा

Desi Jugaad: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेहमीच नवीन काहीतरी व्हायरल होत असते. फेसबूक, इंस्टाग्रामचा वापर करताना कधी कोणता व्हिडिओ आपल्या समोर येईल, याचा काही नेम नाही. यातील काही व्हिडिओ मनोरंजक असतात तर, काही व्हिडिओ अनेकांना आश्चर्यचकीत करतात.असाच एक व्हिडिओ आता इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे, ज्यात एका महिलेने सुईत धागा कसा ओवायचा, हे अगदी सोप्या पद्धतीने करून दाखवले आहे. हा व्हिडिओ अनेकांना आवडला आहे. तसेच या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

सुईत धागा ओवायचे म्हटले की अनेकांना ते कंटाळवाणे किंवा अवघड वाटते. अशा लोकांसाठी एका महिलेने बिनखर्ची देशी जुगाडचा शोध लावला आहे. महिलेने सुईत धागा ओवण्याची इतकी सोपी पद्धत सांगितली आहे की, एखादे लहान मुल देखील हे काम झटक्यात करेल.

व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, सुईत धागा ओवण्यासाठी एका महिलेने घरात असलेले गोळ्यांचे पाकीट घेतले. त्यानंतर या महिलेने गोळ्यांच्या पाकिटाचा एक तुकडा कात्रीने कापला आणि त्याचे टोक सहज सुईच्या छिद्रात जाईल, अशा आकाराचे बनवले. पुढे, त्या तुकड्याला धागा अडकवता येईल, असे लहान कट करते, ज्यात धागा अडकते, जो सुईच्या एका बाजूने सहज दुसऱ्या बाजूला जातो. 

reenachauhan837 या नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. या व्हिडिओला आतापर्यंत अनेकांनी पाहिला आहे. तसेच या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या मेजशीर कमेंटही येत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, सुईचे छिद्र आधीच मोठे आहे, तरीही तुम्हाला त्यात धागा टाकता येत नसेल तर, चांगल्या नेत्रतज्ज्ञांशी संपर्क साधा. दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, 'मॅडम, कृपया मला मशीनमध्ये सुई कशी घालायची ते देखील सांगा. तिसऱ्या युजरने लिहिले आहे की, एक काम करा सर्वांच्या घरी जाऊन त्यांना सुईत धागा ओवून द्या. आणखी एका युजरने म्हटले आहे की, 'आता प्लास्टिक सुईच्या छिद्रात जात नाही, त्यासाठी कोणाकडे काही युक्ती आहे का?'

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर