तिबेटमध्ये हाहाकार; भूकंपामुळे काही तासात १५० वेळा थरथरली पृथ्वी; हजाराहून अधिक घरे जमीनदोस्त, मृतांचा आकडा वाढला
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  तिबेटमध्ये हाहाकार; भूकंपामुळे काही तासात १५० वेळा थरथरली पृथ्वी; हजाराहून अधिक घरे जमीनदोस्त, मृतांचा आकडा वाढला

तिबेटमध्ये हाहाकार; भूकंपामुळे काही तासात १५० वेळा थरथरली पृथ्वी; हजाराहून अधिक घरे जमीनदोस्त, मृतांचा आकडा वाढला

Jan 07, 2025 10:56 PM IST

Tibet Earthquake : तिबेटमध्ये आज झालेल्या विनाशकारी भूकंपात १२६ जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही बचावकार्य सुरू आहे. शिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार, विनाशकारी भूकंपानंतर काही तासांतच पृथ्वी ४.४ रिश्टर स्केलसह १५० पेक्षा जास्त वेळा थरथरली.

तिबेटमध्ये आलेला विनाशकारी भूकंप
तिबेटमध्ये आलेला विनाशकारी भूकंप (via REUTERS)

भारताचा शेजारी देश तिबेट आज भूकंपाच्या तीव्र धक्क्याने हादरला आहे. तिबेटसह उत्तर भारतात मंगळवारी ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या हृदयद्रावक घटनेत १२६ जणांचा मृत्यू झाला असून १३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाऊ शकते. मदत व बाचवकार्य सुरू आहे. चीनची वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपानंतर Aftershocks  जाणवले. पृथ्वी काही तासांत ४.४ रिश्टर स्केलने १५० वेळा थरथरली. ज्या भागात भूकंप आणि़ आफ्टर शॉक्स जाणवले त्या भागांची लोकसंख्या ६९०० आहे. एक हजारांहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली असून विध्वंस दूरवर सर्वत्र दिसत होता.

आज सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी (चीन वेळेनुसार) हा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू डिंग्री काउंटीतील त्सोगो टाऊनशिपमध्ये २८.५ अंश उत्तर अक्षांश आणि ८७.४५ अंश पूर्व रेखांशावर १० किमी खोलीवर होता. भूकंपाच्या केंद्रापासून २० किलोमीटर च्या परिघात २७ गावे असून सुमारे ६,९०० लोक राहत आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार डिंगरी काउंटीची लोकसंख्या ६१,००० हून अधिक आहे. भूकंपानंतर च्या कामासाठी ३,४०० हून अधिक जणांचे बचाव पथक आणि ३४० वैद्यकीय कर्मचारी भूकंपग्रस्त भागात पाठवण्यात आले आहेत.

१००० घरे जमीनदोस्त -

टिंगरी आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराची सरासरी उंची सुमारे ४,०००-५,००० मीटर (१३,०००-१६,००० फूट) आहे. येथे भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. त्यानंतर ४.४ रिश्टर स्केल तीव्रतेचे १५० हून अधिक भूकंपाचे धक्के जाणवले आणि शेकडो लोकांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. ६९०० लोकसंख्या असलेल्या भागात १००० हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली. ढिगाऱ्याखालून जिवंत लोकांचा शोध बचाव पथकाकडून घेतला जात आहे.

या घटनेनंतर सोशल मीडियावर विनाशाची दृश्ये समोर येत आहेत. दुकानांचे व घराचे अवशेष दिसत आहेत. ल्हाटसे शहरात झालेल्या या नैसर्गिक आपत्तीनंतर रस्त्यावर दगड मातीचा ढिगारा पसरला आहे. चीन, नेपाळ आणि उत्तर भारतातील नैर्ऋत्य भागातही भूकंपाचे धक्के जाणवले, अशी माहिती शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिली आहे.

चीनकडून मदत -

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पूरग्रस्त भागात बचाव आणि मदत कार्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. जखमींवर उपचार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत आणि दुय्यम आपत्ती (भूकंपानंतर संभाव्य आपत्ती) टाळण्यासाठी प्रयत्न करावेत, बाधित रहिवाशांचे योग्य पुनर्वसन करावे आणि त्यानंतरचे परिणाम प्रभावीपणे पार पाडावेत, असे आदेश जिनपिंग यांनी दिले. भूकंपानंतर चीन भूकंप प्रशासनाने लेव्हल-२ आपत्कालीन प्रतिसाद सुरू केला आणि आपत्ती निवारणाच्या कार्यात मदत करण्यासाठी एक पथक पाठवले. केंद्र सरकारने भूकंपग्रस्त भागात तंबू, कोट, रजाई आणि फोल्डिंग बेडसह सुमारे २२,००० आपत्ती निवारण सामग्री तसेच उंच आणि थंड प्रदेशांसाठी विशेष मदत सामग्री पाठविली आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर