दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून दिल्ली व एनसीआर परिसरात अनेकदा भूकंपाची नोंद झाली आहे. आज दुपारच्या सुमारास येथे भूकंपाचे धक्के जाणवले. धक्के जाणवताच लोक घरातून बाहेर आले. दिल्ली-एनसीआरमधील अनेक शहरातील लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले. याचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान असल्याचे सांगितले जात आहे.
गुरुवारी दिल्ली-एनसीआर, पंजाबसह चंदीगड आणि जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के खूप वेळापर्यंत जाणवत होते. भूकंपाचे धक्का जाणवताच लोक कार्यालये व आपल्या घरातून बाहेर रस्त्यावर आले. या भूकंपाने कोणत्याही जिवीत किंवा वित्त हानीचे वृत्त नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगानिस्तान मधील फैजाबाद येथे होते. याची रिश्टर स्केलवर तीव्रता ६.२ नोंदवली गेली.
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील पीर पंजाल क्षेत्रातही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के पाकिस्तानमध्येही जाणवले. येथेही लोक घराबाहेर पळताना दिसून आले.
दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचा याआधीच इशारा देण्यात आला आहे. विशेषज्ञांचे म्हणणे आहे की, दिल्ली-एनसीआरमध्ये कधीही मोठा भूकंप होऊ शकतो. मात्र भूकंप कधी येणार याबाबत निश्चित अंदाज वर्तवला नाही. दिल्ली-एनसीआरच्या खाली १०० हून अधिक लांब व खोल फॉल्ट्स आहेत. यातील काही दिल्ली-हरिद्वार रिज, दिल्ली-सरगोधा रिज आणि ग्रेट बाउंड्री फॉल्टवर आहेत. त्याचबरोबर अनेक सक्रिय फॉल्ट्सही त्यांना जोडल्या आहेत.
संबंधित बातम्या