Japan Earthquake : शक्तिशाली भूकंपाने जपान हादरला! ७.१ रिश्टर स्केल तीव्रता, त्सुनामीचा दिला इशारा-earthquake of magnitude 7 1 hits southern japan tsunami warning issued ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Japan Earthquake : शक्तिशाली भूकंपाने जपान हादरला! ७.१ रिश्टर स्केल तीव्रता, त्सुनामीचा दिला इशारा

Japan Earthquake : शक्तिशाली भूकंपाने जपान हादरला! ७.१ रिश्टर स्केल तीव्रता, त्सुनामीचा दिला इशारा

Aug 08, 2024 03:13 PM IST

Japan Earthquake news : दक्षिण जपानमधील क्युशू बेटावर गुरुवारी ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. जपानच्या सार्वजनिक प्रसारक एनएचकेने यापूर्वी भूकंपाची प्राथमिक तीव्रता ६.९ असल्याचे सांगितले होते.

Earthquake of magnitude 6.9 hits southern Japan, tsunami warning issued
Earthquake of magnitude 6.9 hits southern Japan, tsunami warning issued

Japan Earthquake news : जपानला गुरुवारी शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. या भूकंपाची तीव्रता ७.२ रिश्टर स्केल इतकी होती. दक्षिण जपानच्या मियाजाकी इथं भूकंपाचा केंद्र बिंदु असल्याची माहिती आहे. या भूकंपामुळे जपानवर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. हे धक्के बसताच नागरिक जीवाच्या भीतीने घराबाहेर पळाले.

जपानच्या हवामान विभागाने भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल नोंदवल्या गेली आहे. भूकंपाचा केंद्र बिंदु जपानच्या दक्षिण मुख्य द्वीप क्यूशूच्या पूर्व किनारपट्टीवर जवळपास ३० किमीवर अंतरावर नोंदवला गेला. हवामान विभागाने क्यूशूच्या दक्षिण किनारपट्टी व जवळपासच्या भागात तब्बल १ मीटर उंच लाटा येण्याची भीती व्यक्त केली आहे.

एनएचकेने दिलेल्या माहितीनुसार भूकंपामुळे त्सुनामी देखील आली आहे, जी पश्चिम मियाझाकी प्रांतात पोहोचली आहे. एएफपीच्या वृत्तानुसार जपान सरकारने भूकंपाच्या पार्श्वभूमीवर एक विशेष टास्क फोर्स तयार केले आहे. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, भुकंपामुळे कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही.

जपान हा टेक्टोनिक प्रदेशात येत असल्याने जगातील भूकंप प्रवण देश म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी सतत भूकंपाचे धक्के येत असल्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधकामे केली जातात. यामुळे या ठिकाणी मोठा भूकंप झाला तरी  कमी जीवित हानी होते.

जपानला दरवर्षी बसतात सुमारे १५ हजार भूकंपाचे धक्के

सुमारे सव्वाशे दशलक्ष लोकसंख्या असलेल्या या द्वीपसमूहात दरवर्षी सुमारे १५०० भुकपांचे धक्के बसतात. त्यापैकी बहुतांश धक्के हे सौम्य असतात. नववर्षाच्या दिवशी द्वीपकल्पात झालेल्या भीषण भूकंपात किमान २६० जणांचा मृत्यू झाला होता. १ जानेवारीचा भूकंप आणि त्यानंतरच्या धक्क्यांमुळे इमारती कोसळल्या, काही ठिकाणी आग लागली होती तर पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले होते.

जपानच्या ईशान्य किनाऱ्यावर मार्च २०११ मध्ये ९.० रिश्टर स्केलतीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्यामुळे त्सुनामी आली होती. ज्यात सुमारे १८,५०० नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर काही नागरिक बेपत्ता झाले होते. २०११ मध्ये आलेल्या या भूकंपाचा फटका फुकुशिमा अणुप्रकल्पाला बसला. येथील तीन अणुभट्ट्यांमध्ये पाणी गेल्याने पऱ्यावर्णाला मोठे नुकसान झाले होते. ही घटना जपानची युद्धोत्तर सर्वात भीषण आपत्ती व चेर्नोबिलनंतरची सर्वात गंभीर अणुदुर्घटना मानली गेली. या भूकंपामुळे जपानचे १६.९ ट्रिलियन येनचे (११२अब्ज डॉलर्स) नुकसान झाले होते.