नवी दिल्ली– अरबी समुद्रात शुक्रवारी रात्री भूकंपाचे झटके जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सांगितेले की, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४.१ नोंदवली गेली.राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की, भूकंपाचे धक्के रात्री ९ वाजून ५२ मिनिटांनी जाणवले. याचा केंद्रबिंदू कोठे होता याची माहिती अजून समोर आलेली नाही.
पालघर जिल्हाही भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे. रात्री ९ वाजून ५३ मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के बसले आहेत. गेल्या तीन दिवसात हा दुसरा धक्का बसल्याने नागरिकांमध्ये पुन्हा भीतीच वातावरण निर्माण झालं आहे.
तलासरी, उधवा, मोडगाव ,धानिवरी, धुंदलवाडी, कासा ,उर्से या भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहे. हा भूकंप ४.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता.
जपानमधील भूकंपामुळे मृतांचा आकडा वाढला–
पश्चिम जपानमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात आतापर्यंत ६२ नागरीक ठार झाले आहे. या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सुझू,इशिकावा प्रीफेक्चर,जपानमध्ये बुधवारी भूकंपामुळे अग्निशमन दल आणि पोलीस किनारी भागात अडकलेल्या नागरिकांचा शोध घेत आहेत.पश्चिम जपानमधील शक्तिशाली भूकंपामुळे अनेक लोकांचा बळी गेल्यानंतर पंतप्रधानांनी शॉक व्यक्त केला आहे. तसेच बचाव कार्य वेगाने राबवण्यासाठी सूचना दिल्या आहेत. त्यात गोठवणारी थंडी आणि मुसळधार पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आल्याने ही मोहीम अधिक वेगाने राबवली जात आहे. बचाव पथकाने एका श्वनाच्या मदतीने ढिगाऱ्याखली अडकलेल्या एका व्यक्तीला बाहेर काढले.
संबंधित बातम्या