मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Japan Earthquake: भूंकपाच्या ३० धक्क्यांनी जपान हादरले; अनेक शहरे अंधारात, किनारपट्टीला ४ फूट उंचीच्या लाटा धडकल्या

Japan Earthquake: भूंकपाच्या ३० धक्क्यांनी जपान हादरले; अनेक शहरे अंधारात, किनारपट्टीला ४ फूट उंचीच्या लाटा धडकल्या

Jan 01, 2024 04:45 PM IST

Japan Earthquake : भूकंपाच्या तीव्र धक्क्याने जपान हादरलं आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची नोंद ७.४ इतकी नोंदवली गेली आहे. सोमवारी इशिकावा येथे जमिनीला मोठे हादरे बसले. भूकंपाची तीव्रता पाहून त्सुनामीचाही इशाराही देण्यात आला आहे.

Japan Earthquake
Japan Earthquake

वर्ष २०२४ च्या पहिल्या दिवसाची सुरूवात खुपच भयंकर झाली आहे. जपान तीव्र भूकंपाच्या धक्क्याने हादरलं आहे. रिश्टर स्केलवर याची तीव्रता ७.४ इतकी नोंदवली गेली. जपानच्या अधिकाऱ्यांनी जपानच्या इशान्येकडील किनारपट्टीला सुनामी धडकण्याचा इशारा दिला आहे. जपान हवामान विभागाने (JMA) दिलेल्या माहितीनुसार इशिकावा आणि आसपासच्या प्रांतात भूकंपाचे धक्के जाणवले. याची सुरुवातीची तीव्रता ७.४ इतकी होती. हवामान विभागाने निगाटा आणिटो यामा प्रांताच्या पश्चिम किनारपट्टीला सुनामीचा इशारा दिला आहे.

भूकंपाचे धक्के राजधानी टोकियो आणि कांटो भागातही जाणवले. जपानच्या सरकारी टेलिव्हिजन NHK ने सांगितले की, सुनामीच्या इशाऱ्यानंतर ५ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. यामुळे समुद्र किनारपट्टीवरून लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. लोकांनी उंचीवरील ठिकाणी किंवा इमारतींमध्ये जाण्याचे आव्हान करण्यात आले आहेत. इशिकावामधील वाजिमा शहराच्या किनारपट्टीला १ मीटरहून अधिक ऊंचीच्या लाटा धडकल्या.  जपानमधील ३५ हजार घरातील लाईट गेली आहे. अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

जपानच्या नोटो क्षेत्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ११ वेळी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपानंतर जपानमध्ये मागील काही वर्षात आलेला सर्वात तीव्र क्षमतेचा भूंकप आहे.. साल 2011 मध्ये झालेल्या प्रचंड भूकंपामुळे त्सुनामीने उत्तर जपानचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला होता. यात फुकुशिमा अणू प्रकल्पाचेही मोठे नुकसान झाले होते.

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर