मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Earthquake : भूकंपाच्या धक्क्यांनी उत्तराखंड हादरलं; नागरिकांमध्ये दहशत, बचावकार्य सुरू

Earthquake : भूकंपाच्या धक्क्यांनी उत्तराखंड हादरलं; नागरिकांमध्ये दहशत, बचावकार्य सुरू

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 02, 2022 12:50 PM IST

Earthquake In Uttarakhand Today : केदारनाथमध्ये हिमस्खलनाची घटना समोर आलेली असतानाच आता उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमध्ये भूकंप झाल्याची घटना समोर आली आहे.

Earthquake In Uttarakhand Today
Earthquake In Uttarakhand Today (HT)

Earthquake In Uttarakhand Today : देवभूमी केदारनाथमध्ये हिमस्खलनाची घटना ताजी असतानाच आता उत्तराखंडमध्ये भूकंप झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आज सकाळी उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे झटके बसले असून यात कोणतीही जीवीतहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. याशिवाय आता भूकंपानंतर प्रशासनानं मदत व बचावकार्य सुरू केलं आहे.

केदारनाथमध्ये झालेल्या हिमस्खलनानंतर हा भूकंप झाला असल्यानं लोक भीतीच्या छायेखाली आहेत. अनेक लोकं घर सोडून मोकळ्या मैदानात येऊन बसले आहेत. याशिवाय प्रशासनानंही लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याची मोहिम सुरू केली आहे. या भूकंपानंतर प्रशासनाचं एक पथक याबाबतची माहिती घेऊन त्यावर संशोधन करण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

प्रशासन हाय अलर्टवर...

उत्तराखंडमध्ये झालेल्या या भूकंपाची तिव्रता किती होती, हे अजून समजू शकलेलं नाही. परंतु आता भूकंपाचा आणि भूस्खलनाचा वाढता लक्षात घेता रुद्रप्रयागच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विभागात हाय अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळं अनेक नद्यांना पूर आलेला आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी केदारनाथमध्ये हिमस्खलन झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंप झाल्याची घटना समोर आल्यानं नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

IPL_Entry_Point

विभाग