Earthquake in Delhi and NCR: राजधानी दिल्ली सोमवारी रात्री ११.३९ च्या सुमारास भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली. हे धक्के बराच वेळ बसत होते. या भूकंपाचा केंद्रबिंदू हा किर्गिस्तान आणि चीन सीमेवर असल्याचे सांगितले जाते. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ७.२ इतकी मोजली गेली आहे. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की लोक घाबरून घराबाहेर पडले. भारत आणि चीन व्यतिरिक्त किर्गिस्तान, नेपाळ आणि पाकिस्तानच्या काही सीमावर्ती भागातही हे धक्के बसले.
मिळालेल्या माहितीनुसार, किर्गिस्तान आणि चीन सीमेवर असलेल्या शिनजियांग भागात भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.२ इतकी मोजली गेली आहे. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की दिल्ली-एनसीआरमध्येही त्याचा प्रभाव जाणवला. बराच वेळ पृथ्वी थरथरत राहिली. भीतीपोटी लोक घराबाहेर पडून मोकळ्या जागेत आले. नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटरच्या माहितीनुसार, रात्री ११.३९ वाजता भूकंपाचे धक्के बसले.
जर्मनीच्या भूवैज्ञानिक संशोधन केंद्राने म्हटले आहे की भूकंप चीनच्या शिनजियांग प्रदेशात जमिनीच्या १० किमी (६.२१ मैल) जमिनीच्या आत आला. वृत्त लिहेपर्यंत भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही.
भारत आणि चीन व्यतिरिक्त किर्गिस्तान, नेपाळ आणि पाकिस्तानच्या काही सीमावर्ती भागातही भूकंपाचे धक्के बसले.
राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासूंन भूकंपाचे धक्के बसण्याचे प्रमाण हे वाढले आहे. मोठ्या प्रमाणात धक्के बसत असल्याने नागरिक दहशतीत आहेत.
संबंधित बातम्या