दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले. दोन दिवसापूर्वीही भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले होते. गेल्या चार दिवसात दुसऱ्यांदा भूकंप झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.६ इतकी नोंदवली गेली. मिळालेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता.
दिल्लीबरोबरचउत्तराखंडराज्यातील पिथौरागड जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी ४ वाजून १८ मिनिटांनी हा भूकंप जाणवला. दिल्ली-एनसीआरसह उत्तर प्रदेश,बिहार,उत्तराखंड आदि राज्यात धक्के जाणवले. तीन दिवसातदुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवल्याने लोक भीतीने घराबाहेर पळाले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. शुक्रवारी रात्रीही नेपाळमध्ये आलेल्या तीव्र भूकंपाने भारताच्या अनेक भागात धक्के जाणवले होते.
या भूकंपाची तीव्रता ५.६ रिश्टर स्केल इतकी होती.भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तर प्रदेशमधील अयोध्यापासून २३३ किलोमीटर उत्तरेकडे नेपाळमध्ये होता. सामाण्यपणे भूकंप आल्यानंतर धक्के जाणवतात. त्यांना आफ्टरशॉक म्हटले जाते. मात्र हे धक्के कमी तीव्रतेचे असतात. मात्र हा ५.६ तीव्रतेचा भूकंप मध्यम तीव्रतेचा मानला जातो. भूकंपामुळे कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती नाही.
-० ते १.९ रिश्टर स्केलवर भूकंप केवळ सिस्मोग्राफवरून समजते.
- २ ते २.९ रिश्टर स्केल वर भूकंप आल्यानंतर हल्के कंपन होते.
- ३ ते ३.९ रिश्टर स्केल वर भूकंप आल्यानंतर एखादा ट्रक आपल्या जवळून गेल्यासारखा परिणाम होता.
- ४ ते ४.९ रिश्टर स्केल भूकंप आल्यानंतर खिड्क्या तुटतात तसेच भिंतीवर लटकवलेल्या फ्रेम खाली पडतात.
- ५ ते ५.९ रिश्टर स्केलच्या भूकंपाने घरातील फर्निचर हलू लागतात.
- ६ ते ६.९ रिश्टर स्केल भूकंपाने इमारतीला तडे जातात, तसेच वरच्या मजल्यांना नुकसान होते.