दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक राज्यात आज भूकंपाचे धक्के जाणवले. भारताशिवाय पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या काही भागात भूकंपाच्या धक्क्याने धरती हादरली. पाकिस्तानचे वृत्तपत्र द ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, खैबर पख्तूनख्वापासून पंजाबपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.७ इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू डेरा गाझी खानजवळ असल्याचे मानले जात आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीपासून १० किलोमीटर खाली खोल असल्याने याची तीव्रता कमी असल्याचे दिसून आले.
आतापर्यंत भारत, पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानसह कोठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, हरयाणा, जम्मू-काश्मीर आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची वेळ दुपारी १२ वाजून ५८ मिनिटांची नोंदवण्यात आली आहे. सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या म्हणण्यानुसार, भूकंपाची तीव्रता ६ पेक्षा कमी असेल तर फारसा धोका नसतो. पण या भूकंपाचे केंद्र जमिनीखाली फारसे खोल नसल्याने ते धोकादायक ठरू शकले असते. मात्र अद्याप कोणतीही जीवित हानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेनुसार भूकंपाची तीव्रता ५.८ नसून ५.४ इतकी होती. त्याचा परिणाम पाकिस्तानी पंजाबमधील बहुतांश शहरांमध्ये दिसून आला आहे. यामध्ये मियांवाली, खानेवाल, टोबा टेक सिंग, गुजरात, सरगोधा आणि झांग यांचा समावेश आहे. याशिवाय राजधानी इस्लामाबाद, मुलतान आणि लाहोरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. खैबर पख्तुनख्वामधील पेशावर व्यतिरिक्त स्वात खोरे, उत्तर वझिरीस्तान आदी ठिकाणीही भूकंप झाले आहेत. २९ ऑगस्ट ला भूकंप झाला होता, ज्याचे केंद्र अफगाणिस्तानात होते.
यूपीमधील कानपूर येथे रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलेंडर ठेवल्याची घटना ताजी असतांना राजस्थानमधील अजमेर येथे रेल्वे ट्रॅकवर सीमेंटचे मोठे ब्लॉक ठेवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या आठवडाभरात अशा ४ घटना घडल्याने दहशतवादी आता ट्रेन उलटवण्याचा कट रचत असल्याची माहिती तपास यंत्रांना मिळाली आहे. या प्रकरणांमुळे रेल्वे प्रशासानात खळबळ उडाली आहे. सुरक्षा यंत्रणा या प्रकरणी दक्षता घेत आहेत. यूपीपासून राजस्थानपर्यंत दहशतवादविरोधी पथके आणि स्थानिक पोलिसही या प्रकरणी तपास करण्यास सक्रिय झाले आहेत.