मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Earthquake Delhi NCR : दिल्ली-एनसीआर भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरलं, लोकांमध्ये दहशत

Earthquake Delhi NCR : दिल्ली-एनसीआर भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरलं, लोकांमध्ये दहशत

Oct 15, 2023 05:22 PM IST

Earthquakeindelhincr : दिल्लीसह नोएडा,गाजियाबाद,ग्रेटर नोएडा, फरीदाबाद आणि गुरुग्राममध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.

Earthquake in delhi
Earthquake in delhi

Earthquake Delhi NCR : भूकंपाच्या धक्क्याने दिल्ली-एनसीआर पुन्हा हादरलं आहे. दिल्लीसह नोएडा, गाजियाबाद, ग्रेटर नोएडा, फरीदाबाद आणि गुरुग्राममध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. दोन आठवड्यात दुसऱ्यांदा दिल्ली-एनसीआर भूकंपाने हादरले असून लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर अनेक लोक घराच्या बाहेर आले. सांगितले जात आहे की, भूकंपाचा केंद्रबिंदू फरीदाबादजवळ होता. भूकंपाची तीव्रता ३.१ होती. 

राष्ट्रीय भूकंपमापन केंद्रकडून (National Center for Seismology) मिळालेल्या माहितीनुसार  सायंकाळी ४ वाजून ०८ मिनिटांनी हरियाणा राज्यातील फरीदाबादमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.  रिश्टर स्केलवर याची तीव्रता ३.१ होती. रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं अनेक लोक आज घरातच होते. अचानक जमीन हलू लागल्याने लोक घाबरले व आपल्या घरातून निघून रस्त्यावर आले. यापूर्वी ३ ऑक्टोबर रोजीही भूकंपाचे धक्के जाणवले. त्यावेळी भूकंपाची तीव्रता इतकी होती की, लोक घरातून बाहेर पडले. सायंकाळी ४ वाजून ८ मिनिटांशी हे भूकंपाचे धक्के जाणवले.

दिल्ली-एनसीआरमध्ये आलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांनी कोणत्याही प्रकारच्या जीवित किंवा वित्त हानीचे वृत्त नाही. सांगितले जात आहे की, भूकंपाचा केंद्रबिंदू फरीदाबादपासून १० किलोमीटर खोल होता. ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होते. त्या भूकंपाची तीव्रता  ६.२ होती. त्यावेळी दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारत हादरला होता.

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर