मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Earthquake : दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के; नेपाळही हादरले, ६ जणांचा मृत्यू

Earthquake : दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के; नेपाळही हादरले, ६ जणांचा मृत्यू

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Nov 09, 2022 09:13 AM IST

Earthquake : नेपाळसह भारतात सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के बसत आहेत. उत्तराखंडच्या पिथौरागढ इथे पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे जाणवले.

दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के; नेपाळही हादरले, 6 जणांचा मृत्यू
दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के; नेपाळही हादरले, 6 जणांचा मृत्यू (PTI)

Earthquake : नेपाळसह भारतात सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के बसत आहेत. उत्तराखंडच्या पिथौरागढ इथे पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे जाणवले. नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या भागात सकाळी साडे सहाच्या सुमारास जमीन हादरल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. यावेळी भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल इतकी होती.

दिल्लीशिवाय उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी भूकंपाचे हादरे बसले. देशाच्या राजधानीसह आजूबाजुच्या भागात पहाटे भूकंपाचे धक्के बसले. त्याची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल इतकी होती. तर भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. मध्यरात्री दोनच्या सुमारास हे धक्के बसले.

नेपाळला भूकंपाचा मोठा धक्का बसला असून आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल इतकी होती. सध्या लष्कराकडून बचावकार्य सुरू असून अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले असल्याची शक्यता आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र उत्तराखंडच्या पिथौरागढमध्ये नेपाळला लागून असलेल्या सीमेवर होता.

नेपाळच्या दोती जिल्ह्यात घर कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला होता. आता ही आकडेवारी ६ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात नेपाळला चारवेळा भूकंपाचे धक्के बसले. रात्री ३ च्या सुमारास पुन्हा भूकंप झाला. मात्र त्याची तीव्रता कमी होती. मंगळवारी सकाळीसुद्धा भूकंपाचा धक्का बसला होता.

WhatsApp channel

संबंधित बातम्या