Earth Second Moon Visible Today: तुम्ही आता पर्यंत पृथ्वीला केवळ एक चंद्र असल्याचं ऐकलं असेल. या चंद्रामुले पृथ्वीवर भरती आणि ओहोटी येत असते. मात्र, आता पृथ्वीला दूसरा मिनी चंद्र देखील मिळणार आहे. आज पासून हा चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरणार आहे. या चंद्राला लघुग्रह २०२४ पीटी ५ असे नाव देण्यात आले आहे. हा चंद्र तात्पुरता आजपासून पृथ्वीभोवती फिरणार आहे. आज २९ सप्टेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत हा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणार आहे.
या मिनी चंद्राच्या आगमनाने अवकाशप्रेमींची उत्सुकता वाढली आहे. तथापि, त्याच्या लहान आकारामुळे आणि कमी प्रकाशमानामुळे हा चंद्र उघड्या डोळ्यांनी पाहता येणार नाही. सामान्य दुर्बिणीनेही हा चंद्र अवकाश प्रेमींना पाहता येणार नाही, या चंद्राची झलक पाहण्यासाठी खगोलीय दुर्बिणीची गरज भासेल.
स्पेस.कॉमकडून मिळालेल्या माहितीनुसार, नासाला आज २९ सप्टेंबर रोजी दुपारी ३.५४ (अमेरिकन वेळ) पासून लघुग्रह २०२४ पीटी ५ ची छायाचित्रे मिळणे सुरू होईल. त्याच वेळी, हा लघुग्रह २५ नोव्हेंबरच्या सकाळी ११.४३ मिनिटांपर्यंतच दिसणार आहे. अप्रतिम खगोलशास्त्र पॉडकास्ट होस्ट डॉ. जेनिफर मिलार्ड म्हणतात की केवळ खगोलशास्त्रीय दुर्बिणीद्वारेच हा मिनी-मूनची छायाचित्रे घेता येणार आहे. आज तुम्हाला २०२४ पीटीएस लघुग्रहाच्या ताऱ्यांवरून वेगाने जाणाऱ्या नेत्रदीपक प्रतिमा ऑनलाइन पाहता येणार आहेत असे मिलर्ड यांनी बीबीसीला सांगितले.
नासाला पीटी ५ नावाचा हा लघुग्रह या वर्षी ७ ऑगस्ट रोजी पहिल्यांदा दिसला. हा लघु ग्रह अर्जुनाच्या लघुग्रहाच्या पट्ट्यातून होतो. या ठिकाणी पृथ्वीसारखे खडक आहेत. हे खडक अंदाजे ३३ फूट रुंद आहे. मिलर्ड म्हणाले, या लघुग्रहाहा पृथ्वीवर काही ही परिणाम होणार नाही. हा लघु ग्रह पुढे जाण्यापूर्वी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या कक्षेत थोडा बदल होईल. या लघु ग्रहाचा वेग सुमारे २२०० किलोमीटर प्रतितास आहे.
पाहिला गेला आहे. पृथ्वी भोवती फिरणाऱ्या या लघुग्रहाणे अनेकांचे लक्ष वेधले आहे. तर काही लघु ग्रह पृथ्वीच्या जवळून पुढे गेले आहे. यात प्रामुख्याने लघुग्रह २०२२ एनएस १ याचा समावेश आहे. पृथ्वीभोवती पहिल्यांदा १९८१ मध्ये मिनी-मून दिसला होता. हा लघु ग्रह पृथ्वीच्या जवळ आला होता आणि नंतर २०२२ मध्ये पुन्हा हा लघु ग्रह पुन्हा पृथ्वीच्या जवळ आला आहे. २०२४ लघुग्रह पीटी ५ हा लघुग्रह २०५५ मध्ये पृथ्वीच्या कक्षेत परत येण्याची शक्यता आहे.