मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Earth Hour Day 2024 : आज रात्री ८.३० ते ९.३० दरम्यान सर्व वीज उपकरणे राहणार बंद; कारण काय?

Earth Hour Day 2024 : आज रात्री ८.३० ते ९.३० दरम्यान सर्व वीज उपकरणे राहणार बंद; कारण काय?

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 23, 2024 02:58 PM IST

Earth Hour Day Time: दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी अर्थ अवर डे साजरा केला जातो.

अर्थ अवर डेच्या दिवशी जगभरातील लोकांना एका तासासाठी दिवे आणि विद्युत उपकरणे बंद ठेवण्याचे आवाहन केले जाते.
अर्थ अवर डेच्या दिवशी जगभरातील लोकांना एका तासासाठी दिवे आणि विद्युत उपकरणे बंद ठेवण्याचे आवाहन केले जाते.

Earth Hour Day 2024 Significance: वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचरतर्फे दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी अर्थ अवर डेचे आयोजन केले जाते. या दिवशी रात्री ८.३० ते ९.३० पर्यंत जगभरातील कोट्यवधी लोक स्वेच्छेने तासभर विद्युत उपकरणे बंद ठेवतात. दरम्यान, अर्थ अवर डेशी संबंधित खास गोष्टी जाणून घेऊयात.

वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर या संस्थेतर्फे दरवर्षी जगभरात अर्थ अवरचे आयोजन केले जाते. त्यानुसार, जगभरातील कोट्यवधी लोक एका तासासाठी त्यांच्या घरातील विद्युत उपकरणांचा वापर थांबवतात. त्यामुळे त्याला अर्थ अवर म्हणतात. यावर्षी अर्थ अवर आज म्हणजेच २३ मार्च २०२४ रोजी रात्री ८.३० वाजता सुरू होईल. या एका तासासाठी दिवे आणि विद्युत उपकरणे बंद करण्याचे आवाहन केले जाते. १८ व्या आवृत्तीसाठी १९० देश आणि प्रदेशांतील लोक अत्यावश्यक नसलेले दिवे बंद करून सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षी भारताने लक्षणीय सहभाग नोंदविला आणि २५ मार्च रोजी १५० हून अधिक ऐतिहासिक स्थळे, स्मारके, सरकारी इमारती, शैक्षणिक संस्था आणि कॉर्पोरेट कार्यालयातील वीज पुरवठा एका तासासाठी बंद केला होता.

World Water Day 2024: जागतिक पाणी दिन साजरा करण्यामागे उद्देश काय? जाणून घ्या!

अर्थ अवर डे साजरा करण्यामागचे मुख्य कारण

उर्जा वाचवणे या अर्थ अवर डे साजरा करण्यामागील मुख्य कारण आहे. तसेच निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी हवामान बदल करणे, विकासावर लक्ष केंद्रित करणे, निसर्गाची हानी थांबवणे आणि मानवजातीचे भविष्य सुधारणे या यामागचा उद्देश आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जगभरातील लोकांना निसर्गाच्या होणाऱ्या नुकसानीची जाणीव करून दिली जाते. याशिवाय, निसर्गाचा ऱ्हास थांबवण्यासाठी कोणते प्रयत्न केले पाहिजेत? याबाबत माहिती दिली जाते.

अर्थ अवर डेची सुरुवात कशी झाली?

जागतिक वन्यजीव निधी आणि त्याच्या भागीदारांच्या नेतृत्वाखाली २००७ मध्ये ऑस्ट्रेलियात 'लाईट ऑफ' उपक्रम म्हणून अर्थ अवर डेची सुरुवात झाली. त्यानंतर ही एक जागतिक चळवळ बनली आहे, ज्यामुळे लाखो लोकांना एक तासासाठी अनावश्यक दिवे बंद करण्याची प्रेरणा मिळाली आहे. ३१ मार्च २००७ रोजी सिडनीमध्ये स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजता पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर २००८ पासून अर्थ अवर डे संपूर्ण जगभरात साजरा केला जाऊ लागला. २९ मार्च २००८ रोजी जगभरातील लाखो लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

IPL_Entry_Point

विभाग