Viral Video : दोन लाखांची EV वारंवार होत होती खराब! डोकं सटकल्यानं शोरूमच्या समोर नेऊन घातले हातोड्याचे घाव
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video : दोन लाखांची EV वारंवार होत होती खराब! डोकं सटकल्यानं शोरूमच्या समोर नेऊन घातले हातोड्याचे घाव

Viral Video : दोन लाखांची EV वारंवार होत होती खराब! डोकं सटकल्यानं शोरूमच्या समोर नेऊन घातले हातोड्याचे घाव

Jul 26, 2024 11:04 AM IST

viral video : ग्वाल्हेरमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये शोरूमच्या बाहेर एक तरुण आपली ओला ईव्ही स्कूटर हातोड्याने तोडताना दिसत आहे. कंपनीच्या सेवेवर हा तरुण नाराज असल्यान त्यानं शोरूम बाहेर त्याची दुचाकी फोडली.

दोन लाखांची ईव्ही वारंवार होत होती खराब! डोक सटकल्यानं शोरूमच्या बाहेर तरूणानं हातोड्याने फोडली स्कूटर; व्हिडिओ व्हायरल
दोन लाखांची ईव्ही वारंवार होत होती खराब! डोक सटकल्यानं शोरूमच्या बाहेर तरूणानं हातोड्याने फोडली स्कूटर; व्हिडिओ व्हायरल

viral news : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका तरुणाची नवी कोरी ओला ईव्ही ही वारंवार खराब होत होती. त्याने दोन लाख रुपये देऊन ही गाडी घेतली होती. त्याने ही गाडी शोरूममध्ये दाखवून देखील त्याला सेवा मिळत नसल्याने वैतागलेल्या तरुणाने शोरूमच्या बाहेर हातोड्याने त्याची ईव्ही स्कूटर तोडली. यानंतर गाडी शोरूम समोरच सोडून तरुण निघून गेला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वारंवार त्रास होत असतानाही सर्व्हिस सेंटरने स्कूटर ठीक करता येत नसल्याने तरुणाला सांगितल्याने संतापलेल्या तरुणाने सगळा राग गाडीवर काढून हातोड्याने फोडली असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भिंड रोडवर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ राहणारा शिवम गुर्जर या २२ वर्षीय युवकाणे जानेवारी २०२४ मध्ये ओएलए कंपनीची बॅटरी ई-स्कूटर खरेदी केली होती. या गाडीसाठी त्याने कंपनीच्या शोरूमला ५० हजार रुपयांचे डाऊन पेमेंट केले होते. स्कूटरची किंमत १.७ लाख रुपये होती, परंतु लोनवर गाडी घेतल्याने या गाडीची किंमत ही २ लाख १० हजार रुपये झाली. तरुणाने सांगितले की तो गॅरेज चालवतो आणि त्याने ही स्कूटर OLA कडून ईएमआयवर (हप्ते) वर खरेदी केली होती. मात्र, ही गाडी घेतल्यापासून वारंवार नंदुरुस्त होत होती.

खरेदीनंतर अवघ्या दोन महिन्यांनी गाडी पडली बंद

स्कूटर खरेदी केल्यानंतर २ महिन्यांतच खराब होऊन बंद पडत होती. गाडीमधील होणारा बिघाड दुरुस्त करण्यासाठी तरुण शोरूममध्ये गाडी घेऊन गेला. मात्र, सर्व्हिस सेंटरने ही गाडी सुरवातीला दुरुस्त करून दिली. मात्र, गाडी ही वारंवार खराब होत असल्याने शोरूम कर्मचाऱ्यांनी आता ही गाडी दुरुस्त करता येणार नाही असे सांगत हात वर केले. यामुळे तरुण संतापला व त्याने ही गाडी फोडली.

शोरूमच्या लोकांनी ऐकलं नाही

याबाबत शिवमने शोरूमच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली, मात्र त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. अशा स्थितीत कंपनीच्या सेवेवर नाराज होऊन त्यांनी आपली स्कूटर शोरूमच्या बाहेर नेली आणि त्यावर आपला राग काढत ती हातोड्याने फोडण्यास सुरुवात केली. स्कूटर फोडल्यानंतर त्यांनी ती शोरूमच्या बाहेर सोडून निघून गेला.

शोरूम चालक म्हणाला - दुरुस्त करू

या प्रकरणी पोलिसांचे म्हणणे आहे की, आतापर्यंत कोणीही पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आले नाही, कोणी आले तर कारवाई केली जाईल. शोरूम ऑपरेटर अर्पित गोयल यांनी सांगितले की, आम्ही गाडी दुरुस्त करण्यास नकार दिला नव्हता, आम्ही कंपनीने मंजुरी दिल्यावर दुरुस्त करू असे सांगितले होते. आता या घटनेनंतर शोरूमचालक ई-बाईक दुरुस्त करण्याबाबत माहिती त्यांनी दिली.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर