मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral news : आता घोरणेही गुन्हा! घोरण्याच्या सवयीमुळे दोन शेजाऱ्यात वाद विकोपाला! पोलिसांनी केली दोघांना अटक

Viral news : आता घोरणेही गुन्हा! घोरण्याच्या सवयीमुळे दोन शेजाऱ्यात वाद विकोपाला! पोलिसांनी केली दोघांना अटक

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 20, 2024 04:34 AM IST

due to snoring neighbor bother called police : अनेकांना घोरण्याची (snoring problem) सवय असते. यामुळे घोरणाऱ्या व्यक्तीच्या आजूबाजूच्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. मात्र, या त्रासाला कंटाळून एकाने थेट पोलिसांत तक्रार दिली आहे.

अनेकांना घोरण्याची (snoring problem) सवय असते. यामुळे घोरणाऱ्या व्यक्तीच्या आजूबाजूच्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. मात्र, या त्रासाला कंटाळून एकाने थेट पोलिसांत तक्रार दिली आहे.
अनेकांना घोरण्याची (snoring problem) सवय असते. यामुळे घोरणाऱ्या व्यक्तीच्या आजूबाजूच्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. मात्र, या त्रासाला कंटाळून एकाने थेट पोलिसांत तक्रार दिली आहे.

due to snoring neighbor bother called police : एखाद्या व्यक्तीला असणाऱ्या घोरण्याचा सवयीमुळे त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तीला साहजिकच त्रास होत असतो. बरेच जण अनेकदा या समस्येकडे दुर्लक्ष करतात, तर काही जणांमध्ये यावरून वादावादी देखील होत असते. घोरण्याचा या सवयीवरून नुकतीच दोन जणामध्ये झालेली वादावादी इतकी विकोपाला गेली, की चक्क पोलिसांना मध्ये पडत, या दोन्ही व्यक्तींना ताब्यात घ्यावे लागले.

धक्कादायक..! सलून चालकाने घरात घुसून दोन मुलांचा वस्तऱ्याने चिरला गळा

याबाबत उत्तराखंड राज्यातील रुद्रपूर जिल्ह्यातील ट्रान्झिट कॅम्प क्षेत्र येथील पोलीस ठाण्याचे प्रमुख भारत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रान्झिट कॅम्प क्षेत्र येथील एका घरामध्ये एक व्यक्ती भाडेकरू म्हणून राहत आहे. या व्यक्तीस मोठ्याने घोरण्याची सवय आहे. त्यामुळे त्याच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना त्रास होतो. नुकतेच एका रात्री हा भाडेकरू आपल्या घरात झोपलेला असताना, अचानकपणे कोणीतरी त्याच्या दरवाजाचे दार जोरजोरात वाजवत होते. त्या भाडेकरूने दार उघडल्यावर त्याचा शेजारी दार वाजवत असल्याचे कळले. त्यानंतर त्या दोघांमध्येही घोरण्याचा विषयावरून जबरदस्त वादावादी झाली. ही वादावादी इतकी वाढली की शेजारील व्यक्तीने पोलिसांना फोन करून बोलावून घेतले. पोलिस ज्यावेळी घटनास्थळावर पोहचले, त्यावेळी घोरण्याचा सवयीवरून वादावादी होत असल्याचे लक्षात येताच, तेही अवाक झाले.

Unseasonal Rain : विदर्भाला अवकाळी पावसाने झोडपले! गारपीट, वादळी वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान

पोलिसांनी त्या दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघेही ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात घेऊन गेले.

याठीकानी दोघांनाही समज देण्यात आली. तसेच अशा प्रकारे पुन्हा भांडण केल्यास शांतता भंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची तंबी दिली. त्यानंतर दोघांनाही घरी सोडण्यात आले.

एकूणच घोरण्याच्या सवयीमुळे विविध प्रकारचा त्रास तुम्हाला सहन करावा लागू शकतो, हे या घटनेमधून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

IPL_Entry_Point

विभाग