मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Gujrat Flood: गुजरात, मध्यप्रदेशमधील पुराचा रेल्वेला फटका अनेक गाड्या रद्द; दिल्ली, राजस्थानला जाणारी सेवा विस्कळीत

Gujrat Flood: गुजरात, मध्यप्रदेशमधील पुराचा रेल्वेला फटका अनेक गाड्या रद्द; दिल्ली, राजस्थानला जाणारी सेवा विस्कळीत

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 18, 2023 12:14 PM IST

Due to Gujrat, Madhy pradesh Flood many train cancle: मध्य प्रदेशानंतर गुजरातमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. हजारो नागरिकांना याचा फटका बसला आहे. पुराचा रेल्वे सेवेवर देखील परिणाम झाला असून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्याने दिल्ली, राजस्थान येथील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

Indian Railways
Indian Railways (MINT_PRINT)

Gujart, MP Flood : मध्य प्रदेश पाठोपाठ गुजरातमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोठ्या प्रमाणात अनेक जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. भरुचसह अनेक जिल्ह्यांमध्ये मोठा भाग पाण्याखाली गेला आहे. पुरामुळे हजारो नागरिकांनी आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी गेले आहेत. खबरदारी म्हणून येथील शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. गोध्रा-रतलाम मार्गावरील अमरगड पंच पिपलिया येथे ट्रॅकवर पाणी साचल्याने अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या. याचा परिमाण दिल्ली, राजस्थान प्रवासावर झाला आहे. या सोबतच महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Kolhapur News : सापावर पाय पडल्याच्या भीतीनं घेरलं; कोल्हापुरात चिमुकल्याचा घाबरून ताप आल्यानं मृत्यू

या गाड्यांच्या वेळा बदलल्या

ट्रेन क्र. १२९५३ मुंबई सेंट्रल - हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस जी १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:१० वाजता सुटणार होती, तिची वेळ बदलून १२.३० करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबई सेंट्रल-जयपूर सुपरफास्ट क्रमांक १२५९५५ ही गाडीही पहाटे १ वाजता सुटणार होती, ती १७ तारखेला ती ७:०५ वाजता सुटणार होती. १२२२८ इंदूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस, जी १७ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता सुटणार होती, ती आज १८ रोजी सकाळी ६ वाजता सुटणार आहे.

Mohan Bhagvt : मोहन भागवतांचा डाव्यांवर प्रहार!, ''लहान मुलांना गुप्त अवयवांविषयी विचारणं हा डाव्या विचारसरणीच्या…”

या गाड्या प्रभावित

रेल्वे क्रमांक १२९३४ अहमदाबाद-मुंबई सेंट्रल कर्णावती एक्स्प्रेस फक्त वापीपर्यंत धावणार आहे. वापी ते मुंबई सेंट्रल दरम्यान ही गाडी रद्द करण्यात आली. ट्रेन क्रमांक १९८१९ वडोदरा-कोटा एक्सप्रेसही आज १८ सप्टेंबर रोजी रतलामपर्यंतच धावणार आहे. ही गाडी रतलाम ते वडोदरा दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तर रेल्वे क्रमांक १९३४० दाहोद एक्स्प्रेस १८ सप्टेंबर रोजी नागदापर्यंतच धावणार आहे. नागदा-दाहोद दरम्यान ही गाडी रद्द करण्यात आली आहे. १९ सप्टेंबर रोजी नागदा-दाहोद दरम्यानची गाडी क्रमांक १९३३९ दाहोद-भोपाळ एक्स्प्रेसही रद्द करण्यात आली आहे. रेल्वे क्रमांक १९३३९ दाहोद भोपाळ एक्स्प्रेस नागदा ते दाहोद दरम्यान आज रद्द करण्यात आली आहे.

 

या गाड्या झाल्या रद्द

-२२९५३ मुंबई-अहमदाबाद गुजरात एक्सप्रेस १८ सप्टेंबर रोजी रद्द.

-२०९०१ मुंबई गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेस रद्द.

-२०९५९ वलसाड-वडनगर इंडरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस रद्द

-१२९३४ अहमदाबाद-मुंबई १८ सप्टेंबर रोजी रद्द.

-१२९३२ अहमदाबाद मुंबई १८ सप्टेंबर रोजी रद्द

-१२९२९ वलसाड-वडोदरा इंडरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस रद्द

-८२९०२ अहमदाबाद-मुंबई तेजस एक्स्प्रेसही रद्द करण्यात आली.

- ८२९०१ मुंबई अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

-०९१६१ वलसाड-वडोदरा एक्सप्रेस रद्द

- १२४७१ वांद्रे टर्मिनस-श्री माता वैष्णोदेवी कटरा स्वराज एक्सप्रेस रद्द

-१२९२५ वांद्रे टर्मिनस- अमृतसर रद्द.

-१९०३३ वलसाड-अहमदाबाद गुजरात क्वीन एक्सप्रेस रद्द

-२२९२९ डहाणू रोड- वडोदरा सुपरफास्ट एक्सप्रेस रद्द

- ०९१५५ सुरत वडोदरा मेमू स्पेशल रद्द

- ०९५४६ नागदा-रतलाम स्पेशल रद्द करण्यात आली आहे.

- ०९३८३ रतलाम-उज्जैन स्पेशल देखील १७ १८ सप्टेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे.

- ०९३८१, दाहोद रतलाम स्पेशल १७-१८ रोजी रद्द.

- ०९३५७ दाहोद रतलाम स्पेशल १७-१८ तारखेला रद्द

WhatsApp channel