Viral News : जगभरात चहा प्रेमींची संख्या मोठी आहे. चांगला चहा पिण्यासाठी ही मंडळी कोठेही जायला तयार असतात. चहाची किंमत १० रुपयांपासून सुरू होते. मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन जर तुम्ही चहा प्यायला तर तुम्हाला जास्तीत जास्त ५०० ते १००० रुपये मोजावे लागेल. पण, तुम्ही कधी विचार केला असेल का ? की एक कप चहाची किंमत १ लाख रुपये असू शकते? होय, हे खरे आहे.
तुमचा विश्वास बसत नसला तरी दुबईतील एका रेस्टॉरंटचा मेन्यूत चहाची किंमत तब्बल १ लाख रुपये ऐवढी आहे. भारतीय वंशाच्या एका उद्योजकाने दुबईत हे रेस्टॉरंट उघडले आहे. या चहाला 'गोल्ड कडक' चहा असे नाव देण्यात आले असून या चहाचे दर सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेरचे आहे. सुचेता शर्मा असे या भारतीय व्यावसायिकाचे नाव असून त्यांच्या मालकीच्या बोहो कॅफेने चहाची किंमत ५००० एईडी (सुमारे १.१४ लाख रुपये) आहे. या चहाची खासियत म्हणजे २४ कॅरेट सोन्याच्या पापुद्रा व चांदीच्या कपमध्ये हा चहा सर्व्ह केला जातो. हा चहा सोन्याने जडलेल्या चांदीच्या भांड्यांमध्ये दिला जातो. या चहाचा कप ग्राहक स्मृति म्हणून त्यांच्या सोबत घेऊन जाऊ शकतात.
बोहो कॅफे डीआयएफसीच्या एमिरेट्स फायनान्शियल टॉवर्समध्ये आहे. या कॅफेचा मेनू खूपच इंटरेस्टिंग आहे. यात भारतीय स्ट्रीट फूडचा पर्याय देखील खवय्यांना देण्यात आला आहे. खलीज टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मेन्यूमध्ये गोल्ड मेमरी कॉफी, गोल्ड डस्ट क्रॉसेंट, गोल्ड ड्रिंक्स आणि गोल्ड आईस्क्रीम यांचा समावेश आहे. "श्रीमंत नागरिकांच्या गरजा ओळखून हा कॅफे तयार करण्यात आला आहे. श्रीमंत खवय्यांसाठी काहीतरी विलक्षण करण्याची इच्छा असल्याने हा कॅफे उघडण्यात आला आहे. या कॅफेच्या 'रॉयल मेन्यू'मध्ये सिल्व्हरवेअरमध्ये सर्व्ह केल्या जाणाऱ्या गोल्ड स्मारिका कॉफीचा समावेश आहे. ही कॉफी ४७६१ एईडी (अंदाजे १.०९ लाख रुपये) एवढी आहे.
या चहावर अनेक नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका फूड ब्लॉगरने बोहो कॅफेबद्दल एक व्हिडिओ अपलोड केला जो व्हायरल होत आहे. रेस्टॉरंटमध्ये कोणत्या गोष्टी खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यासाठी तुम्हाला किती पैसे मोजावे लागू शकतात हे या व्हिडिओत सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर कॅफेमध्ये चहा-कॉफी सर्व्ह करण्याची पद्धत किती अनोखी आहे, याचाही उल्लेख व्हिडिओत करण्यात आला आहे. इंटरनेटवर 'गोल्ड कडक' चहा व्हायरल झाला आहे. यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या चहाची काय गरज होती ? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. तर सर्वसामान्यांचा प्रिय असलेल्या चहासाठी एक लाख रुपये कसे मोजावे लागतील? एकाने उपहासाने म्हटले आहे. तर एकाने, 'हा चा पिण्यासाठी ईएमआय भरावा लागेल असे गंमतीने म्हटलं आहे.
संबंधित बातम्या