viral news : दुबईच्या राजकुमारीनं पतीला इंस्टाग्रामवर दिला तिहेरी तलाक, सवतींनी केलं कौतुक! काय आहे प्रकरण ? वाचा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  viral news : दुबईच्या राजकुमारीनं पतीला इंस्टाग्रामवर दिला तिहेरी तलाक, सवतींनी केलं कौतुक! काय आहे प्रकरण ? वाचा

viral news : दुबईच्या राजकुमारीनं पतीला इंस्टाग्रामवर दिला तिहेरी तलाक, सवतींनी केलं कौतुक! काय आहे प्रकरण ? वाचा

Jul 17, 2024 02:43 PM IST

dubai princess sheikha mahra triple talaq : दुबईच्या शासकाची मुलगी शेखा महरा बिंत मोहम्मद बिल रशीद अल मख्तम हिने तिच्या पतीला तिहेरी तलाक दिला आहे. इन्स्टाग्रामवर एक स्फोटक पोस्ट लिहून तिने हा तलाक घेतला आहे. तिची हे घटस्फोट प्रकरण सध्या सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहे.

दुबईच्या राजकुमारीनं पतीला इंस्टाग्रामवर दिला तिहेरी तलाक, सवतींनी केलं कौतुक! काय आहे प्रकरण ? वाचा
दुबईच्या राजकुमारीनं पतीला इंस्टाग्रामवर दिला तिहेरी तलाक, सवतींनी केलं कौतुक! काय आहे प्रकरण ? वाचा

dubai princess sheikha mahra triple talaq : दुबईच्या शासकाची मुलगी शेख महरा बिंत मोहम्मद बिल रशीद अल मकतूम हिने तिच्या पतीला घटस्फोट दिला आहे. जगातील सुंदर महिला अशी ओळख असलेल्या शेखा महरा बिंत मोहम्मद बिल रशीद अल मकतूम हीचा हा घटस्फोट सध्या चांगलाच चर्चेत आहे. तिने तिच्या पतीला इंस्टाग्रामवर वादग्रस्त पोस्ट लिहून तीन वेळा तलाख तलाख तलाख लिहून घटस्फोट घेतला आहे. तिच्या या धाडसाचे तिच्या सवतींनी मात्र कौतुक केले आहे. ही माहिती दिली आहे. शेखा महराने गेल्या वर्षी मे महिन्यात बिझनेसमन शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूमशी लग्न केले होते. ती आता त्याच्या मुलाची आई झाली आहे. मात्र तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय का घेतला या बद्दल आता सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

यूएईचे उपराष्ट्रपती व दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांची मुलगी राजकुमारी शेखा महरा आई झाली आहे. शेखा महारा हिने गेल्या आठवड्यात एका सुंदर मुलीला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर मुलाच्या जन्मानंतर लगेचच फोटो शेअर करून तिने हॉस्पिटलचा अनुभवही शेअर केला आहे. राजकुमारी महरा यांनी दुबईच्या लतीफा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आणि 'बेबी माहरा'ला या जगात आणणे हा 'सर्वात अविस्मरणीय अनुभव' असल्याचे सांगितले. महाराने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती आपल्या नवजात मुलीला छातीशी धरून बसलेली दिसत आहे. मात्र, तिला कन्यारत्न झाल्यावर तिने पत्नीशी घटस्फोट का घेतला असावा यावर आता चर्चा सुरू आहे.

शेख महरा ही स्वतः मोठी उद्योजिका आहे. ती अनेक व्यवसाय हाताळत असून सोशल मीडियावर देखील खूप अॅक्टिव असते. ती इस्लामिक जगतातील काही महिला नेत्यांपैकी एक आहे जी इतकी लोकप्रिय आणि सक्रिय राजकारणात नेहमी चर्चेत असते. राजकुमारी शेखा महराने इंस्टाग्रामवर लिहिले, 'प्रिय पती, तू तुझ्या इतर साथीदारांसोबत व्यस्त आहेस. म्हणून मी तुला घटस्फोट देत आहे. मी घटस्फोट घेतो, मी घटस्फोट घेतो. मी घटस्फोट देत आहे. काळजी घ्या. तुझी भूतपूर्व पत्नी.' एवढेच नाही तर महाराने तिच्या पतीसोबतचे सर्व फोटो इंस्टाग्रामवरून डिलीट देखील केले आहेत. येथे तिने 'इतर साथीदार' असे लिहिले आहे, ज्याचा अर्थ असा काढला जात आहे की तिचा नवरा हा कदाचित त्याच्या इतर पत्नींमध्ये व्यस्त आहे आणि यामुळेच तिने घटस्फोट दिला आहे.

या वर्षी मे महिन्यात दुबईच्या राजकुमारी शेख महाराने काही फोटो शेअर केले होते. याद्वारे तिने सांगितले की ती एका मुलीची आई झाली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले होते. तिने एक फोटो शेअर केला होता ज्यात तिचा नवराही तिच्या शेजारी उभा होता. राजकन्या शेख महाराने तिच्या मुलीला छातीशी धरले होते. यातील एका छायाचित्रात व्यापारी शेख मानाही त्यांच्या मुलीसोबत दिसत होते. आता राजकन्येने तो फोटोही इन्स्टाग्रामवरून डिलीट केला आहे. निकाह सोहळ्यानंतर अवघ्या ५ महिन्यांतच राजकुमारीने ती गर्भवती असल्याची माहिती दिली होती. यावेळी पोस्ट लिहीत तिने याची माहिती देत 'आम्ही आता तिघे होणार असे लिहिले होते.

शेख महरा यांचे वडील शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम हे दुबईचे शासक आहेत. याशिवाय ते UAE चे संरक्षण मंत्री देखील आहेत. शेख महरा त्यांच्या २६ मुलांपैकी एक आहे. त्याची आई झो ग्रिगोराकोस ग्रीसची होती. मात्र, तीची आईही तिच्या वडिलांपासून विभक्त झाली आहे. शेख महराचे तिच्या आईशी जवळचे नाते आहे आणि ती अनेकदा तिच्यासोबतचे फोटो देखील शेअर करत असते.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर