Morena Viral News : मुरैना येथे लग्नात मोठा गोंधळ उडाला. एका वराने त्याच्या लग्नात मित्रांबरोबर भरपूर दारू प्यायली. यानंतर लग्न विधीसाठी तो घोडीवरून मंडपात आला. मात्र, मद्यधुंद असल्याने त्याला चालनेही कठीण होते. तो घोडीवरून खाली पडला. यानंतर कसे बसे उठून तो डोलत डोलत मंडपात आला. यावेळी वधू विवाहातील एक विधी म्हणून हातात हार घेऊन वराची वाट पाहत उभी होती. मात्र, वराची अवस्था पाहून तिने रडायला सुरुवात केली तसेच मद्यधुंद वराशी लग्न करण्यास नकार देत थेट पोलिस ठाण्यात धाव घेत वराला जन्माची अद्दल घडवली.
हे प्रकरण मुरैना जिल्ह्यातील नगरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भडवली गाव येथे घडली. या प्रकारानंतर संतापलेल्या वधूने सर्वांना पोलिस ठाण्यात नेले. या ठिकाणी वर आणि वधू पक्षाकडील सर्व मंडळी रात्रभर पोलीस ठाण्यात बसून होते. वर पक्षाने यावेळी वधू पक्षावर मारहाण करून पैसे उकळल्याचा आरोप केला. तसेच वर व त्याच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात या बाबत तक्रार दाखल केली.
भिंड जिल्ह्यातील लाहार येथील रहिवासी असलेले वीरेंद्र राजावत हे त्यांच्या मुलाच्या लग्नाची मिरवणुक घेऊन नागारा भागातील भदवली गावात आले होते. वधूच्या घरी लग्नाची तयारी पूर्ण झाली होती. लग्न घटिका समीप होती. गावाबाहेरील एका इमारतीत लग्नाची मिरवणूक थांबली. मध्यरात्री, वाजत गाजत वराची लग्न मिरवणूक वधूच्या दारात पोहचली. मात्र, वराची अवस्था पाहून वधू भेदरली आणि घाबरली.
वधूच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले आहे की, वराने लग्नाच्या मिरवणुकीत आलेल्या मित्रांसोबत दारू प्यायली होती. त्यानंतर नशेत असलेला वर वधूच्या दारात घोडीवरून खाली उतरत असताना जमिनीवर पडला. वराची अवस्था अशी होती की त्याला स्वतःला उभे राहताही येत नव्हते. इतरांनी त्याला उभे केले. मात्र, चालता चालता तो पुन्हा खाली पडला.
पोर-टिका नामक लग्नातील विधीचा एक भाग म्हणून वधू वराच्या स्वागतासाठी हार घालून उभी होती. मात्र, दारूच्या नशेतील वराची अवस्था पाहून तिने रडायला सुरुवात केली. तिने मद्यधुंद वराशी लग्न करण्यास नकार दिला. वधूला खूप समजावले, पण ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली. वधूने वराला आणि लग्नाच्या मिरवणुकीला जाण्यास सांगितले. यामुले वराच्या बाजूचे लोक संतप्त झाले. या यानंतर दोन्ही बाजूच्या नतेवाईकांमध्ये हाणामारी झाली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही पक्षांशी चर्चा केली. लग्नाच्या खर्चाच्या नावाखाली वधूच्या वडिलांनी मारहाण करून ४.९० लाख रुपये घेतल्याचा आरोपही वराच्या बाजूच्या लोकांनी केला आहे. दोन्ही पक्ष रात्रभर पोलिस ठाण्यात बसून होते. त्यानंतर मिरवणूक परतली. पोलिसांनी वराच्या बाजूचा तक्रार अर्ज स्वीकारला असून त्याची चौकशी करत आहेत.
वधूच्या दारात पोहोचताच वर नशेत येऊन कोसळला, हे पाहून वधूने लग्नाला नकार दिला आणि लग्नाची मिरवणूक परत केली. दोन्ही पक्ष आपापल्या तक्रारी घेऊन पोलीस ठाण्यात आले. वराच्या बाजूने वधूच्या बाजूने मारहाण आणि पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोप करणारा अर्ज दाखल केला आहे, त्याची चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक रामकुमार गौतम यांनी दिली.