Viral News: मध्य प्रदेशातील एका प्राथमिक शाळेतील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शिक्षा म्हणून शिक्षकाने विद्यार्थिनीचे केस कापले आहेत. केल्याप्रकरणी एका शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थीचे केस कापताना संबंधित शिक्षक दारूच्या नशेत असल्याचे दिसत आहे. या प्रकरणी शिक्षकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश बाथम यांनी दिली. वीरसिंह मेधा असे या शिक्षकाचे नाव आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ मध्य प्रदेशातील सेमलखेडी येथील शासकीय प्राथमिक शाळेतील असल्याचे समजत आहे. या व्हिडिओत आरोपी शिक्षक शाळेतील विद्यार्थिनीचे वेणी कात्रीने कापताना दिसत आहे. आपले केस कापले जाणार म्हणून मुलगी खूप रडत आहे. तर, तिचा एक वर्गमित्र तिचे सांत्वन करताना दिसत आहे. दारूच्या नशेत शिक्षकाने गावकऱ्यांशी वाद घातला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आदिवासी विभागाच्या सहाय्यक आयुक्त रंजना सिंह यांनी मेधा यांच्या निलंबनाचे आदेश दिले.
लीच्या रडण्याचा आवाज ऐकून जवळच राहणारा एक व्यक्ती शाळेत आला. तिथे पोहोचल्यावर रहिवाशाला दिसले की, शिक्षक मद्यधुंद अवस्थेत मुलीचे केस कापत आहे. याबाबत त्या व्यक्तीने शिक्षकाकडे जाब विचारला असता त्याने सांगितले की, 'पीडित मुलीने अभ्यास केला नाही. यामुळे शिक्षा म्हणून तिचे केस कापले जात आहे.' पण गावकऱ्याने केस कापण्यास विरोध केला आणि संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला. मात्र, आरोपी शिक्षकाने व्हिडिओ काढ किंवा काहीही कर, मला कोणीच काही करू शकत नाही, अशी त्या व्यक्तीला धमकी दिली.
मात्र, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आणि शिक्षकाच्या निलंबनाचे आदेश जारी केले. प्राथमिक तपासादरम्यान मुलीच्या जबाबाच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले. आरोपी शिक्षिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.