दारूच्या नशेतील ऑटोचालकाने अचानक बदलला मार्ग! घाबरलेल्या महिलेनं धावत्या रिक्षातून मारली उडी; बेंगळुरू येथील घटना
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  दारूच्या नशेतील ऑटोचालकाने अचानक बदलला मार्ग! घाबरलेल्या महिलेनं धावत्या रिक्षातून मारली उडी; बेंगळुरू येथील घटना

दारूच्या नशेतील ऑटोचालकाने अचानक बदलला मार्ग! घाबरलेल्या महिलेनं धावत्या रिक्षातून मारली उडी; बेंगळुरू येथील घटना

Jan 05, 2025 05:07 PM IST

Bengaluru Crime News: कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑटो राईडमध्ये एका महिलेला असुरक्षित वाटल्याने तिला उडी मारून स्वत:ला वाचवावे लागले. तिने थांबण्यास सांगूनही ऑटोचालकाने ऑटो थांबवला नाही. यानंतर महिलेने धावत्या ऑटोमधून उडी मारली.

डोळे लाल अन् मद्यधुंद ऑटोचालकाने अचानक बदलला मार्ग! घाबरलेल्या महिलेनंन धावत्या रिक्षातून मारली उडी; बेंगळुरू येथील घटना
डोळे लाल अन् मद्यधुंद ऑटोचालकाने अचानक बदलला मार्ग! घाबरलेल्या महिलेनंन धावत्या रिक्षातून मारली उडी; बेंगळुरू येथील घटना (Pixabay)

Bengaluru Crime News: कर्नाटकची राजधानी आणि आयटी सिटी बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पूर्व बंगळुरूमध्ये एका ३० वर्षीय महिलेने धावत्या ऑटोतून आपला जीव वाचवण्यासाठी उडी मारली. मद्यधुंद ऑटोचालकाने अचानक मार्ग बदलत माहीलेला दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, महिलेला असुरक्षित वाटू लागल्याने तिने ऑटो चालकाला थांबायला सांगितले. मात्र, त्याने रिक्षा थांबवला नाही. यामुळे तिने थेट धावत्या रिक्षातून उडी मारली.  महिलेच्या पतीने ही घटना सोशल मीडियावर शेअर केली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीसांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे.  

ॲपद्वारे केला ऑटो बुक 

महिलेने अद्याप या घटनेबद्दल पोलिसांकडे कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही.  परंतु तिचा पती, एक व्यापारी असून त्याने पत्नीवर बेटलेला प्रसंग सोशल मिडियावर कथन केला आहे. यानंतर त्याची पोस्ट व्हायरल झाली आहे. पतीने त्याची पोस्ट ही  बेंगळुरू शहर पोलिसांना टॅग केली आहे. त्याने  इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने  चालक नशेत असल्याचा आरोप  केला. थानिसांद्र येथील रहिवासी अझहर खान यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, त्यांच्या पत्नीने होरामवू ते थानिसांद्रातील त्यांच्या घरापर्यंत 'नम्मा यात्री' ॲपद्वारे ऑटो-रिक्षा बुक केली होती. रात्री ८.५२ च्या सुमारास चालकाने त्याला तिच्या ऑफिस पासून बसवले. चालक नशेत होता. त्याने वाटेल अचानक मार्ग बदलला. यामुळे घाबरलेल्या पत्नीने  ड्रायव्हरला ऑटो  थांबण्याची विनंती करूनही त्याने तिचे ऐकले नाही. यानंतर रात्री ९.१५  च्या सुमारास ऑटोचा वेग कमी झाल्याने तिने नाईलाजाने धावत्या ऑटोतून उडी मारत स्वत:चा जीव वाचवला.  

नेमकं काय झालं ? 

 खान यांनी पोस्टमध्ये लिहिलं की,  माझी पत्नी तिच्या कामासंदर्भात काही कर्मचाऱ्यांना भेटण्यासाठी ऑफिसला गेली होती. घरी परतत असताना तिने नम्मा यात्री ॲपद्वारे ऑटो रिक्षा बुक केली.  ड्रायव्हरचे डोळे लाल होते. तो  नशेत असल्याचं तिला समजलं. ती  ऑटोमध्येबसली. चालकाने  नागवाडा येथे पोहोचल्यावर  थानिसंद्राकडे जाण्याऐवजी ऑटो उड्डाणपुलाकडे नेला. यावेळी  खान यांच्या पत्नीने चालकाला चुकीचा मार्ग घेतल्याचे सांगितले. मात्र, चालकाने त्यांना कोणतेही उत्तर दिले नाही आणि ऑटो पुढे नेत राहिला. तिने चालकाला ऑटो   थांबविण्याची वारंवार विनंती केली, मात्र त्यांनी त्याने तिचे  ऐकले नाही. डाऊन रॅम्पवर वाहनाचा वेग कमी झाल्यावर तिने चालत्या ऑटोतून उडी मारली. सुदैवाने तिला दुखापत झाली नाही. जेव्हा ती चालायला लागली तेव्हा ड्रायव्हर तिच्याजवळ आला. तसेच  तिला गाडीत बसण्यास सांगितले आणि तिला सोडण्याचे आश्वासन दिले. खान म्हणाले, त्यांच्या पत्नीने  नकार दिला आणि ऑनलाइन पेमेंट केले. त्यानंतर घरी परतण्यासाठी दुसरी ऑटो रिक्षा भाड्याने घेतली.

पतीने व्यक्त केली चिंता 

खान म्हणाले की माझी पत्नीने घडलेला प्रकार फोनवरून सांगितला.  परंतु नेटवर्कमुळे मी तिच्याशी संपर्क साधू शकलो नाही. जेव्हा ड्रायव्हरने चुकीचा मार्ग घेतला तेव्हा माझ्या पत्नीने मला याबद्दल मेसेज केला.  मी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु नेटवर्कमुळे तिच्याशी  संपर्क करू शकलो नाही. ऑटोतून उडी मारल्यानंतर तिने  मला पुन्हा मेसेज केला. यानंतर तिने  दूसरा ऑटो घेतला तेव्हाच आम्ही बोलू शकलो. अशा आपत्कालीन परिस्थितीत 'नम्मा यात्री' शी संपर्क साधण्याची कोणतीही सोय नाही. ऑटो नोंदणी क्रमांक आणि ड्रायव्हरच्या तपशीलासाठी आम्ही कंपनीशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले की त्यांना २४  तास हवे आहेत.

पूर्व बेंगळुरूमध्ये २ जानेवारी रोजी एका ३० वर्षीय महिलेने चालत्या रिक्षातून उडी मारल्याने ती थोडक्यात बचावली होती. मद्यधुंद अवस्थेत दिसणारा ड्रायव्हर स्पष्ट सूचना देऊनही तिला अनोळखी ठिकाणी घेऊन जात असल्याचे तिच्या लक्षात येताच ही घटना घडली.

बेंगळुरू शहर पोलिसांनी  दिले उत्तर

या घटनेची अधिकृत माहिती पोलिसांना देण्यात आली नसली तरी खान यांच्या सोशल मीडिया पोस्टकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना नागरिकांनी सावध गिरी बाळगावी आणि निष्काळजी वाहनचालकांवर कडक कारवाई करावी, अशी विनंती त्यांनी केली. बेंगळुरू शहर पोलिसांनी सोशल मीडिया पोस्टला प्रतिसाद देत पीडितेचा संपर्क क्रमांक आणि ऑटोडिटेल्स मागितले. नम्मा यात्रीने लिहिले की, "अझर, या प्रकरणी आम्हाला पोलिसांशी जोडल्याबद्दल धन्यवाद. निश्चिंत राहा, आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरून ड्रायव्हरचे अकाऊंट सस्पेंड करून तात्काळ कारवाई केली आहे. तुम्हाला आणखी काही मदत हवी असेल तर कृपया आम्हाला डीएम करा."

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर