मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Drugs Seized In Gujarat : मुंबई पोलिसांचे गुजरातमध्ये छापे; भरूचमधून हजार कोटींचं ड्रग्ज जप्त

Drugs Seized In Gujarat : मुंबई पोलिसांचे गुजरातमध्ये छापे; भरूचमधून हजार कोटींचं ड्रग्ज जप्त

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 17, 2022 05:43 PM IST

Drugs seized in Gujarat: मुंबई पोलिसांनी गुजरातमध्ये मोठी कारवाई करत ५१३ किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत.

Drugs Seized In Gujarat By Mumbai Police
Drugs Seized In Gujarat By Mumbai Police (HT_PRINT)

Drugs Seized In Gujarat By Mumbai Police : काही दिवसांपूर्वी मुंबईत कोट्यवधीचं ड्रग्ज जप्त केल्यानंतर आता मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलच्या वरळी युनिटनं गुजरातच्या अंकलेश्वर आणि भरुचमधून ५१३ किलो ड्रग्ज जप्त केलं आहे. याशिवाय ड्रग्ज तयार करणाऱ्या एका कंपनीचाही पर्दापाश केला आहे. मुंबई पोलिसांनी जप्त केलेल्या एमडी ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात १०२६ कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणात आता मुंबई पोलिसांनी एका महिलेसह सात आरोपींना अटक केली आहे. यापैकी पाच आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

आंतरराज्यीय टोळीचा पर्दापाश...

मुंबई पोलिसांनी पकडलेल्या हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज आरोपी हे मुंबईसह देशातील विविध शहरांमध्ये विकत होते, याशिवाय आरोपींचं अनेक राज्यांमध्ये नेटवर्क असण्याची शंका पोलिसांना आहे. त्यामुळं आता पोलिसांनी याबाबतही चौकशी करायला सुरुवात केली आहे. याआधी मार्च महिन्यात मुंबई पोलिसांनी शिवाजीनगरमध्ये ड्रग्जचा मोठा साठा जप्त केला होता, तेव्हापासून पोलीस या आरोपींच्या शोधात होते, त्यामुळं ड्रग्ज कारभार करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना पाच महिने संघर्ष करावा लागला आहे.

मुंबई पोलिसांनी या छापेमारीबाबत दिलेल्या माहितीनुसार, तरुणांना ड्रग्ज पुरवणारी ही टोळी अनेक महिन्यांपासून कार्यरत होती, आरोपी इतर राज्यांमधून ड्रग्जची तस्करी करून मुंबईत हाय प्रोफाईल सर्कलमध्ये विकत होते, त्यामुळं आता एक हजार कोटी रुपयांच्या ५१३ किलो ड्रग्जच्या साठ्याला जप्त करण्यात आलं असून पुढील कारवाई केली जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

IPL_Entry_Point

विभाग