Viral News : कॅब चालकाचं घाणेरडं कृत्य! राईड रद्द केल्यामुळं डॉक्टर महिलेला पाठवले अश्लिल व्हिडिओ
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : कॅब चालकाचं घाणेरडं कृत्य! राईड रद्द केल्यामुळं डॉक्टर महिलेला पाठवले अश्लिल व्हिडिओ

Viral News : कॅब चालकाचं घाणेरडं कृत्य! राईड रद्द केल्यामुळं डॉक्टर महिलेला पाठवले अश्लिल व्हिडिओ

Nov 03, 2024 12:10 PM IST

Viral Video : प्रवासाला उशीर झाल्याने बुकिंग रद्द केल्यावर कॅब ड्रायव्हरने एका महिलेला अश्लील व्हिडिओ पाठवल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून ही घटना सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. नेटकऱ्यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

कॅब चालकाचं घाणेरडं कृत्य! राईड रद्द केल्यामुळं डॉक्टर महिलेला पाठवले अश्लिल व्हिडिओ
कॅब चालकाचं घाणेरडं कृत्य! राईड रद्द केल्यामुळं डॉक्टर महिलेला पाठवले अश्लिल व्हिडिओ

Viral News : कोलकात्यात एका कॅब चालकाने  एका महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेने प्रवासाला उशीर झाल्यामुळे कॅब बुकिंग रद्द केली होती. या मुळे संतापलेल्या कॅबचालकाने महिलेला तिच्या मोबाइलवर अश्लील व्हिडिओ पाठवले. या प्रकरणी पीडित महिलेले पोलिसांत धाव घेत आरोपी कॅब चालका विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.  पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर लैंगिक छळ, महिलेचा विनयभंग आणि धमकावणे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही घटना सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. नेटकऱ्यांनी कॅबचालकाच्या या कृत्याचा निषेध केला आहे. पीडित महिला ही शनिवारी रात्री ८ वाजता खासगी रुग्णालयातून बाहेर पडली. यावेळी तिने कॅब बूक केली. मात्र, कॅब चालकाने येण्यास उशीर लावल्याने या डॉक्टर महिलेने कॅब  बुकिंग रद्द केले. यानंतर आरोपीने  महिला डॉक्टरला किमान १७ वेळा फोन करून त्रास दिला. तसेच कॅब का रद्द केली याचा जाब विचारला, मात्र,  पीडित महिलेने त्याला उत्तर दिले नाही. यानंतर आरोपीने शिवीगाळ करत महिलेच्या व्हॉट्सअॅपवर अश्लील मजकूर व व्हिडिओ पाठवले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असून आरोपीने महिलेला वाईट मेसेज आणि व्हिडिओ पाठवल्याचं निष्पन्न झालं आहे.  

ड्रायव्हरने या महिला डॉक्टरला  प्रवास रद्द केल्यास परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देखील दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिलेने आधी पोलिस आयुक्त आणि सहपोलिस आयुक्तांकडे या घटनेची ऑनलाइन तक्रार दिली. त्यानंतर त्यानंतर पूर्व जादवपूर पोलिस ठाण्यात जात तिने तिच्या सोबत झालेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना देत या प्रकरणी तक्रार दाखल केली.

एककडे कोलकात्यात  ज्युनिअर डॉक्टर महिलांच्या सुरक्षेसाठी आंदोलन करत असताना ही घटना घडली आहे. तीन महिन्यांपूर्वी कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर