मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  धावत्या बसमध्ये चालकाला हार्ट अटॅक! मरता मरता वाचवले तब्बल ६५ जणांचे प्राण

धावत्या बसमध्ये चालकाला हार्ट अटॅक! मरता मरता वाचवले तब्बल ६५ जणांचे प्राण

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 30, 2024 03:24 PM IST

west bengal news : पश्चिम बंगालमधील बालासोरमध्ये चालत्या बसमध्ये बस चालकाला हृदयविकाराचा झटका आला. जीवनाच्या शेवटच्या क्षणीही चालकाने प्रसंगावधान राखत बेशुद्ध होण्यापूर्वीच बस रस्त्याच्या बाजूला थांबवून ६५ प्रवाशांचे प्राण वाचवले.

west bengal news
west bengal news

driver has heart attack in moving bus in west bengal balasor : पश्चिम बंगालमध्ये एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. धावत्या बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका आला. जीवनाच्या शेवटच्या क्षणीही प्रसंगावधान राखत चालकाने गाडीचा ब्रेक दाबत गाडी रस्त्याच्या बाजूला घेत थांबवली. आणि बसमध्ये प्रवास करणाऱ्या तब्बल ६५ भाविकांचे प्राण वाचवले. सर्व भाविक बालासोर जिल्ह्यातील निलगिरी येथील पंचलिंगेश्वरला दर्शनासाठी जात होते.

Solapur murder : शाळेत मस्ती करतो म्हणून वैतागलेल्या बापाने कोल्ड्रिंक्समधून विष देऊन मुलाला संपवले!

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व प्रवासी कोलकाता येथील होते. बालासोरमध्येच चालक एसके अख्तर यांना हृदयविकाराचा झटका आला. चालक अख्तर यांच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्याने त्याने बस रस्त्याच्या कडेला थांबवली. यानंतर काही वेळातच तो बेशुद्ध झाला. प्रवाशांनी चालकाला तातडीने निलगिरी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी अख्तर यांना मृत घोषित केले.

Losar Festival : भारतासह तिबेटमध्ये लोसार नववर्षाच्या जल्लोष! 'हे' आहे महत्व

तेथील एका गावकऱ्याने सांगितले की, जेव्हा बस अचानक थांबली तेव्हा त्याला वाटले की ड्रायव्हरला लघुशंकेसाठी जायचे आहे. पण, त्याच्या जवळ गेल्यावर चालक अख्तर हा बेशुद्ध पडल्याचे दिसले. त्याला ताबडतोब रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता. ही बस हावडा येथून आली असल्याचे सांगण्यात आले.

गेल्या आठवड्यात हरियाणातूनही अशीच एक घटना समोर आली होती. येथे चालत्या बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका आला. बसचे नियंत्रण सुटल्याने कंडक्टर सावध झाला आणि त्याने स्टेअरिंगचा ताबा घेत प्रसंगावधान राखत बस थांबवली होती. बस बाजूला घेत चालकाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे चालकाचा जीवही वाचला होता.

WhatsApp channel

विभाग