Pradhan Mantri Awas Yojana-Urban: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. मोदी यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली १० जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत धानमंत्री आवास योजनेंतर्गत (PMAY) तीन कोटी अतिरिक्त घरांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी १ कोटी घरे पंतप्रधान शहरी आवास योजने अंतर्गत बांधली जाणार आहेत. जुलैमध्ये येणाऱ्या अर्थसंकल्पात यासाठी निधीची व्यवस्था केली जाणार आहे. यामुले सर्वसामान्य नागरिकांचे शहरात घर घेण्याचे स्वप्न या योजणेमुळे पूर्ण होणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत, गेल्या नऊ वर्षांत सुमारे ८४ लाख घरे बांधण्यात आली आहेत.. तसेच ही घरे लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आली आहेत. आता केंद्र सरकारने या योजनेचा विस्तार करण्याचे नियोजन केले आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील महिन्यात सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), निम्न उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम उत्पन्न गट (MIG) यांच्यासाठी परवडणाऱ्या घरांच्या योजनेत बदल करण्यात येणार आहेत. ही योजना शहरांमध्ये राबवली जाण्याची शक्यता आहे.
डिसेंबर २०२४ च्या अंतिम मुदतीपूर्वी PMAY-U योजना लाँच होण्याची शक्यता आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात असणाऱ्या मागण्यांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. नव्या योजनेचे एक कोटी घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही योजना सुरू झाल्यापासून नऊ वर्षांत, ८४ लाख घरे बांधण्यात आली आहेत. तसेच ती PMAY-U अंतर्गत लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आली आहेत, असे मंत्रालयाने काढलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
या संदर्भात माहीती देतांना एका अधिकाऱ्याने सांगितले की, नवीन योजना PMAY या योजनेपासून धडे घेऊन नव्याने राबवण्यात येणारी योजना प्रभावीपणे राबावण्यासाठी कृती आराखडा तयार करेल. ही योजना २५ जून २०१५ पासून सुरू झाली होती. ती या वर्षी डिसेंबरमध्ये संपणार आहे. नव्या योजनेवर काम करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. परंतु नवीन योजना लाभार्थ्यांपर्यंत अधिक चांगल्या प्रकारे पोहोचण्यावर भर दिला जाणार आहे. सर्व गरजूंना वेळेवर घरे मिळावीत, अशी सरकारची इच्छा आहे.
संबंधित बातम्या