Dr. Pradip Kurulkar : खळबळजनक! ‘डीआरडीओ’चे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकरांनी दोन महिलांवर केले अत्याचार-drdo director dr pradeep kurulkar raped two women ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Dr. Pradip Kurulkar : खळबळजनक! ‘डीआरडीओ’चे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकरांनी दोन महिलांवर केले अत्याचार

Dr. Pradip Kurulkar : खळबळजनक! ‘डीआरडीओ’चे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकरांनी दोन महिलांवर केले अत्याचार

Jul 11, 2023 11:46 AM IST

Drdo scientist pradeep kurulkar honey trap case : डीआरडीओचे संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी दोन महिलांवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात माहिती देण्यात आली आहे.

Drdo scientist pradeep kurulkar honey trap case
Drdo scientist pradeep kurulkar honey trap case (IDU Twitter)

पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे (डीआरडीओ) पुण्यातील एका प्रयोग शाळेचे संचालक राहिलेले वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी शत्रूराष्ट्र असेलेल्या पाकिस्तानी हेराला अतिशय संवेदनशील माहिती दिल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, डॉ. प्रदीप कुरुलकर यांचे पाकिस्तानी हेर झारा दास गुप्ता हिच्या सोबत असलेले संबंध उघडकीस असतांनाच त्यांचे आणखी दोन महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक: उद्धव ठाकरे

हनी ट्रॅप मध्ये अडकलेल्या कुरुलकर यांनी देशाच्या सुरक्षे संबंधी अनेक संवेदनशील माहिती ही पाकिस्तानी महिला हेराला दिल्याची माहिती उघड झाली आहे. दरम्यान, कुरूलकर हे स्त्री लंपट असल्याची माहिती देखील आता पुढे आली आहे. एटीएसने कोर्टात सादर केलेल असलेल्या दोषारोप पत्रात ही माहिती उघड झाली आहे. तपासात डॉ. प्रदीप कुरुलकर यांचे डीआरडीओच्या आर अँड डीई या प्रयोग शाळेच्या अधिकृत व्हेंडर असलेल्या एका महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याचे पुढे आले आहे.

Chadrapur Crime : चंद्रपूर हादरले ! पुतण्याकडून सूनेवर अतिप्रसंग, जाब विचारायला गेलेल्या काकूची दगडाने ठेचून हत्या

संबंधित महिलेने कुरूलकर यांच्या माध्यमातून डीआरडीओचे विविध टेंडर मिळावेत याकरिता डॉ. कुरुलकर यांच्याशी जवळीक साधली. या दोघांत झालेल्या व्हाॅटसअप चॅटिंग तपास यंत्रणेला मिळालेले आहे. प्रत्यक्षात देखील तिची व कुरुलकर यांच्या भेटीगाठी झालेल्या असल्याचे तपासात अढळले आहे. पाकिस्तानी हेर झारा दासगुप्ता हिला इन्स्टाग्राम, ईमेल, मोबाईल मेसेज द्वारे डॉ. कुरुलकर यांनी महत्वपूर्ण संरक्षक माहिती पुरविल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. डॉ. कुरुलकर यांना ‘२६ स्वीटपांडा ’या जीमेलच्या माध्यमातून पाकिस्तान येथून संर्पक साधल्याचे देखील उघड झाले आहे.

कुरुलकर यांना डीआरडीओने खासगी फोन बंदी असतांनाही असतानाही त्यांनी स्वत:जवळ फोन बाळगत त्यात नॅशनल अॅरोस्पेस लॅब्रोटरी याचे प्रोक्युअरमेंट व्हीज्युअलअॅटोनॉमस अनमॅन डाक्युमेंट, एरिअल व्हेईकल सिस्टीम या विषयावरील माहिती फोनमध्ये संग्रहीत केली. पाकिस्तानी एजंटने कुरुलकर यांना व्हिडीओ कॉल करण्यासाठी त्यांच्या फोनमध्ये “bingechat.net” आणि “cloudchat.net” असे ॲप डाउनलोड करण्यास सांगितलं होते. 

Maharashtra Politics : वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची गुप्त बैठक; पण तासाभरातच अजित पवार पडले बाहेर

या द्वारे दोघे संवाद साधत होते. या सोबत ते व्हॉट्सॲपद्वारे देखील संवाद साधत होते. कुरुलकरांनी व्हॉट्सॲप चॅट करत असतांना देशाच्या सुरक्षेच्या संबंधी अनेक महत्वाची माहिती ही पाकिस्तानी हेराला दिली. कुरूलकरांनी भारतीय क्षेपणास्त्र यंत्रणा, तसेच सुरू असलेले विविध प्रकल्प या सोबतच ड्रोन तसेच डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचे वेळापत्रक देखील पाकिस्तानी गुप्तचर एजंटला दिली. एवढेच नाही तर नुकतेच भारतीय हवाई दलात दाखल झालेल्या राफेल विमानाबाबत देखील त्यांनी पाकिस्तानी हेराला माहिती दिल्याचे त्यांच्या चॅटमध्ये उघड झाले आहे. कुरूलकरांनी अनेक महत्वाची कागदपत्रे आणि ब्ल्यु प्रिंट सोबत गोपनीय आणि संवेदनशील कागदपत्रे त्यांच्या मोबाइलमध्ये सेव्ह केले होते. एटीएसने याप्रकरणातसीआयरपीसी१६१ प्रमाणे ६९ जणांचे तरल तीन साक्षीदारांचे सीरअारपीसी१६४ प्रमाणे जबाब नोंददवून गोपनीय कागदपत्रे न्यायालयात सादर केली आहेत.

Whats_app_banner
विभाग